शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कलह

By admin | Updated: July 14, 2016 00:59 IST

राजकारण : पुढील बुधवारी दोन नव्या सदस्यांची नियुक्ती

 नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदाचा वर्षभराचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या मनसेच्या सुरेखा भोसले आणि मेघा साळवे या दोन सदस्यांचे राजीनामे पक्षाने मंजूर केले असून, त्यावरून सध्या पक्षात जुंपली आहे. यशवंत निकुळे यांना मात्र अभय देण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान, स्थायी समितीच्या या दोन रिक्त जागांसाठी येत्या बुधवारी (दि.२०) महासभेत नियुक्तप्रक्रिया राबवली जाणार आहे.महापालिकेच्या महत्त्वपूर्ण स्थायी समितीसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच असते. त्यातच आता निवडणुकीऐवजी पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्तीची पद्धत असल्याने राजकीय पक्ष निर्धास्त झाले असून, दोन वर्षांसाठी सदस्यांचा कालावधी असताना आता या समितीवर प्रत्येकाला संधी मिळावी, यासाठी दरवर्षीच पक्षाच्या सदस्यांचे राजीनामे घेऊन अन्य सदस्यांना संधी दिली जाते. स्थायी समितीवर असलेल्या मनसेच्या सुरेखा भोसले, मेघा साळवे आणि यशवंत निकुळे या तीन सदस्यांचा वर्षभराचा कालावधी फेबु्रवारी महिन्यात संपल्यानंतर अन्य सदस्याला संधी देण्यासाठी त्यांचे राजीनामे पक्षाने घेऊन ठेवले मात्र सभापतिपदाची निवडणूक झाल्यानंतर हे राजीनामे स्वीकृत करण्याचे ठरले होते. परंतु आता पक्षाने राजीनामे मंजूर करू नये, यासाठी सर्वच सदस्य इच्छुक असताना पक्षाने सुरेखा भोसले आणि मेघा साळवे यांचे राजीनामे मंजूर केले असून त्यांच्या जागी पक्षाच्या अन्य सदस्यांना संधी मिळावी, यासाठी येत्या २० जुलै रोजी महासभेत नियुक्ती केली जाण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेत अंतर्गत वाद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. कारण, तीनपैकी दोन जणांचे राजीनामे घेण्यात आले असून कोणाचे राजीनामे मंजूर झाले हे संबंधितांना अद्याप ज्ञात नाही. महापौर कार्यालयाकडून मात्र भोसले आणि साळवे यांचे राजीनामे मंजूर करण्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)