शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कमी पर्जन्यमानाचा परिणाम : शेकडो कूपनलिका आटल्या; शेतीवर सावट, पाण्यासाठी जनावरांची तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2016 22:48 IST

दिंडोरी तालुक्यात विहिरींनी गाठला तळ

भगवान गायकवाड ल्ल दिंडोरीगेल्या काही वर्षांपासून जमिनीतील पाण्याची पातळी घटत असताना तालुक्याच्या ज्या पश्चिम भागात धरणे आहेत तेथे अत्यल्प पाऊस झाल्याने यंदा सारीच धरणे अर्धी भरली. परिणामी आवर्तन न सुटल्याने यंदा अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेकडो कूपनलिका आटल्या असून, विहिरींनी तळ गाठला आहे.कधीही पाणीटंचाई न जाणवलेल्या विविध नद्यांलगतच्या गावांना यंदा नुसत्या टंचाईच्या झळा पोहोचत नाही तर यंदा टँकर मागविण्याची वेळ आली असून, टँकरमुक्त दिंडोरी तालुक्याला २२ गावांना टँकर मागणीची वेळ येणार आहे तर तब्बल ११३ गावे यंदा पाणीटंचाईच्या फेऱ्यात आली असून, त्यात अजून वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. इतर तालुक्यांची तहान भागविणाऱ्या दिंडोरी तालुक्याला यंदा प्रथमच तहानलेला राहण्याची वेळ आली आहे. दिंडोरी तालुक्यातील १५५ गाव पाड्यांना यापूर्वीच विविध योजनांमधून नळ पाणीपुरवठा राबविल्या गेल्या असून, गावोगावी शेकडो कूपनलिका हातपंप आहे. मात्र यंदा प्रथमच विविध कूपनलिकांचे पाणी आटले असून, हातपंप शोभेचे बाहुले झाले आहे तर फेब्रुवारीतच अनेक विहिरींनी गाठल्याने विविध गावांना पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पंचायत समितीतर्फे आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून तिमाही पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा बनविला असून, त्यात मार्चपर्यंत आठ गावांना टँकर देण्याची तर जूनपर्यंत पुन्हा दहा गावांना टँकर देण्याची वेळ येण्याचा अंदाज बांधला आहे. प्राथमिक टप्प्यात ज्या गावात पाणीटंचाई जाणवू लागली आहे तेथे आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. विहिरींचे खोलीकरण, खासगी विहीर अधिग्रहण आदि कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. विविध गावातील नादुरुस्त पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. विविध गावात कूपनलिका खोदण्यात येत आहे; मात्र अनेक कूपनलिका कोरड्या जात असल्याने मोठी अडचण झाली आहे. टंचाई आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात पाच गावे व एक वाडी येथे उपाययोजना करण्यात आल्या दुसऱ्या टप्प्यात ६५ गावे आठ पाडे येथे उपाययोजना करण्यात येत आहे तर तिसऱ्या टप्प्यात ३३ गावे व एकपाडे येथे उपाययोजना करण्यात येणार आहे. असे यंदा तब्बल एकूण १०३ गावे १० वाडी-पाडे यांना टंचाईच्या झळा पोहोचल्या असून, यात अजून गावे वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उर्वरित गावांत मोठ्या प्रमाणात पाणीकपात करावी लागत आहे.कादवासह इतर नदीवर अवलंबून असणाऱ्या अनेक गावांना पाणीटंचाई दिंडोरी तालुक्यात सात धरणे असून, कादवा, उनंदा, कोलवण या प्रमुख नद्यांवर विविध गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे यंदा सारेच धरणे न भरल्याने या नद्यांना पाणी सोडले न गेल्याने साऱ्या नद्यांचे नदीपात्र कोरडे झाले आहे. त्यामुळे या गावांना प्रथमच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात प्रामुख्याने चिंचखेड, कुर्णोली, खडकसुकेणे, लोखंडेवाडी, जोपूळ, मातेरेवाडी, पाडे, हातनोरे यांचा समावेश आहे.