शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक गमावला

By admin | Updated: April 16, 2015 00:44 IST

रावसाहेब कसबे : शोकसभेत पुरोगामी संघटनांनी वाहिली श्रद्धांजली

नाशिक : डॉ. यशवंत सुमंतच्या जाण्याने समविचारी मित्र हरपला असून, हे अंत:करणासाठी अत्यंत वेदनादायी आहे. मितभाषी व मृदू स्वभावाचा आणि खुल्या पुरोगामी विचारांचा अभ्यासक राज्यातील पुरोगामी चळवळीने गमावला, अशा शब्दामध्ये ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी आदरांजली वाहिली.ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत व परिवर्तनवादी लेखक डॉ. यशवंत सुमंत यांचे नुकतेच निधन झाले. शहरातील पुरोगामी संघटनांच्या वतीने सीबीएसवरील हुतात्मा स्मारकात सुमंत यांच्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सुमंत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कसबे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. ते म्हणाले, यशवंत यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची कधी न भरून निघणारी हानी झाली आहे. एक खुल्या विचारांचा मित्र व साध्या सोप्या भाषेत परिवर्तनवादी तत्त्वज्ञान सांगणारा अभ्यासक म्हणून त्यांना विसरणे अवघड आहे. १९८० पर्यंत पुरोगामी विचारांच्या साचलेल्या डबक्यांना छेद देऊन या राज्यात वैचारिक प्रवाहाला गती देण्याचे अत्यंत महत्त्वाचे योगदान यशवंत यांनी चळवळीसाठी दिले आहे. महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच यशवंत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मार्क्स यांचेही आकर्षण होते. त्यामुळेच त्यांना सगळ्यात ‘तरुण’ विचारवंत असे म्हटले जात होते. या जगामध्ये केवळ अध्यात्म आणि विज्ञान या दोनच गोष्टी चिरंतन आहे, अशा साध्या सोप्या भाषेत यशवंत तत्त्वज्ञान समजावून देत होता. त्यांच्या लेखणी व वाणीने या राज्यात पुरोगामी विचारांचा झरा नेहमीच खळखळता ठेवला. यावेळी व्यासपीठावर प्रा. सुरेश जोंधळे, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव हुदलीकर, छाया देव, राजू देसले, मंगला गोसावी, मुकुंद दीक्षित, डॉ. प्रदीप जायभावे, कृष्णा चांदगुडे, सचिन मालेगावकर यांच्यासह पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.