शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या वृक्षलागवडीला पुन्हा ‘खो’

By admin | Updated: July 17, 2016 00:18 IST

ठेकेदारांची असमर्थता : फेरनिविदा काढण्याचा निर्णय

नाशिक : महापालिकेने ठेकेदारांमार्फत शहरात सुमारे २१ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेतला परंतु लागवडीसाठी १५ फुटावरील वृक्ष उपलब्ध होत नसल्याने ठेकेदारांनी असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे मनपाच्या वृक्षलागवडीला पुन्हा एकदा ‘खो’ बसला आहे. आता मुदतीत लागवड होत नसल्याबद्दल मनपाने संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा आणि फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने निविदा काढताना मात्र १५ फुटाची अट १० फुटावर आणली जाणार आहे.महापालिकेने शहरात २१ हजार रोपांची लागवड करण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी घेतला होता. त्यासाठी सुमारे साडेचार कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानुसार, महापालिकेने पाच ठेकेदारांना वृक्षलागवडीबरोबरच एक आणि पाच वर्षे देखभाल-संवर्धनाचा ठेका दिला होता. सुरुवातीला कडक उन्हाळा आणि शहरात सुरू असलेली पाणीकपात या पार्श्वभूमीवर ठेकेदारांनी पावसाळ्यात वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेण्याची परवानगी मागितली होती. याशिवाय, १५ फुटावरील वृक्षरोप उपलब्ध होत नसल्याने अट शिथिल करण्याची मागणीही केली होती. परंतु मनपा आपल्या अटींवर ठाम राहिली. दरम्यान, महापालिकेने सदर ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिल्यानंतर ठेकेदारांनी वृक्षलागवडीची तयारी दर्शविली आणि कामास सुरुवातही केली. एका ठेकेदाराने गुजरातमधून १५ फुटावरील ७३ वृक्षरोप आणून लावले परंतु नंतर सुमारे २०० वृक्षांची उंची १५ फुटांपेक्षा कमी भरल्याने मनपाने त्यांना बाद ठरविले. १५ फुटांवरील वृक्ष उपलब्ध होत नसल्याने ठेकेदारांनी आता वृक्षलागवडीस असमर्थता दर्शविली असून काही ठेकेदारांनी चक्क त्यातून माघार घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वृक्षलागवडीचा कार्यक्रम पुन्हा एकदा रखडला आहे.