शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात अडवून सिलिंडर गाडी चालकाची लूट

By admin | Updated: May 15, 2014 00:28 IST

सिडको : गॅस सिलिंडर वितरित करणार्‍या चालकाला अडवून मारहाण करीत त्याच्या जवळील सुमारे १३ हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिडको : गॅस सिलिंडर वितरित करणार्‍या चालकाला अडवून मारहाण करीत त्याच्या जवळील सुमारे १३ हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या बुधवारी दीड वाजेच्या सुमारास वैशंपायन गॅस एजन्सीचे कर्मचारी राकेश पाटील रा. पवननगर हे टॅम्पो (क्रमांक एमएच१५/बीएन/३७६९) घेऊन गॅस सिलिंडर वितरित करीत असताना दुपारच्या सुमारास दोन दुकींवरील चार व्यक्तींनी त्यांची गाडी अडविली. चालक पाटील यांना दमबाजी व धक्काबुक्की करीत त्यांच्याकडे असलेली सुमारे १३ हजार रुपयांची रोकड, भ्रमणध्वनी हिसकावून त्यांनी पळ काढला. याप्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, खुटवडनगर भागात गुन्हेगारीने डोके वर काढले असून, त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा, तसेच पाटील यांना न्याय मिळावा यासाठी सिडकोतील राजकीय पदाधिकार्‍यांनी पोलीस उपआयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांची भेट घेतली. यात सिडको भाजपा मंडल अध्यक्ष जगन पाटील, कॉँग्रेस गटनेता लक्ष्मण जायभावे, भाजपा उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, माजी नगरसेवक बाळासाहेब पाटील, नाना भामरे, दीपक मटाले, विजय पाटील, सुरेश पाटील, प्रकाश अमृतकर आदि उपस्थित होते.(वार्ताहर)