शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

२२ लाखांच्या विदेशी मद्यसाठ्याची लूट

By admin | Updated: March 9, 2017 01:48 IST

नाशिक : मुंबईकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाच्या चालकाचे कारमध्ये आलेल्या संशयितांनी अपहरण करून मद्यसाठा व वाहन असा सुमारे २९ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याची घटना घडली आहे़

 नाशिक : मुंबईकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या आयशर वाहनाच्या चालकाचे कारमध्ये आलेल्या संशयितांनी अपहरण करून मद्यसाठा व वाहन असा सुमारे २९ लाख ४४ हजार रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील वाडीवऱ्हे शिवारात रात्रीच्या सुमारास घडली आहे़ याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात पाच संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाट्याजवळ असलेल्या मॅकडॉवेल कंपनीच्या विदेशी मद्याचे ६०० बॉक्स मुंबईतील कांदिवली येथील गुदामात आयशरमधून (एमएच ४१, जी ७०२९) नेले जात होते़ आयशरचालक नीलेश बापू देसले (२८, रा़ शांती चौक, पवननगर, सिडको) हा सोमवारी (दि़ ६) रात्री अकरा वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गाजवळील रायगडनगरमधून मुंबईकडे आयशर घेऊन जात होता़ रायगडनगर शिवारातून जात असताना एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या संशयितांनी आयशरला कार आडवी लावून गाडी थांबविली़ त्यापैकी एकाने आयशर चालकास लहान मुलाला धडक दिल्याच्या कारणावरून खाली खेचून मारहाण करण्यास सुरुवात केली़ यानंतर आयशर चालक देसले यांचे दोन्ही मोबाइल बळजबरीने काढून घेतले तर एकाने आयशरचा ताबा घेत तो पळवून नेला़ यानंतर उर्वरित चौघांनी देसलेला कारमध्ये बळजबरी बसवून घेत घोटी-सिन्नर रोडवरील विराज हॉटेलच्या पुढे नेऊन सोडून दिले़ (प्रतिनिधी)