शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव श्वानांवर नजर

By admin | Updated: May 18, 2017 00:49 IST

निर्बीजीकरण : सनदी अधिकाऱ्याच्या श्वानाची कहाणीमोकाट वाऱ्यावर,

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : गेल्या मंगळवारी (दि. १६) महापौरांनी गोदाघाटावर भेट दिली त्यावेळी त्यांना परिसरातील एकाही श्वानाचे निर्बीजीकरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले होते. भटके व मोकाट श्वान वाऱ्यावर सोडून देत ठेकेदाराकडून पाळीव श्वानांना लक्ष्य केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, त्याचा अनुभव एका उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याला आला आहे. महापालिकेमार्फत भटक्या व मोकाट श्वानांवर नियंत्रण आणण्यासाठी निर्बीजीकरणाच्या माध्यमातून उपाययोजना केली जाते. त्यासाठी महापालिकेने ९० लाख रुपयांचा वार्षिक ठेकाही दिला आहे. सदर ठेकेदाराने मोकाट व भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करणे अपेक्षित आहे. दरवर्षी सुमारे ६ हजार श्वानांचे निर्बीजीकरण केले जाते. महापालिकेमार्फत निर्बीजीकरणासाठी स्वतंत्र ठेका दिला जात असतानाही मोकाट व भटक्या श्वानांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत नाही. आता तर भटक्या व मोकाट श्वानांवर नजर ठेवण्याऐवजी संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून पाळीव श्वानांना लक्ष्य केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. पंधरा दिवसांपूर्वीची घटना आहे. शहरातील एका उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या निवासस्थानी गोल्डन रिट्रीवर जातीचे पाळीव श्वान आहे. अधिकाऱ्याच्या बंगल्यावरील सेवकाने रात्री ९ वाजेच्या सुमारास श्वानास बाहेर फिरविण्यासाठी आणले असता, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी सेवकास दम भरत श्वानाचे निर्बीजीकरण करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. सेवकाने घाबरून मालकाला दूरध्वनीद्वारे कल्पना दिली आणि श्वानाची ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांपासून मुक्तता करून घेतली. या प्रकारामुळे श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मुळात घरगुती पाळीव श्वानांच्या निर्बीजीकरणासाठी सदर ठेका दिलेला नाही. त्यामुळे ठेकेदाराचे जे कुणी कर्मचारी पाळीव श्वानांनाही लक्ष्य करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. निर्बीजीकरणाची मोहीम ही प्रामुख्याने, सकाळच्या सुमारास राबविली जाते. श्वानमालकांनी पाळीव श्वानांची नोंदणी करणे अपेक्षित आहे.- डॉ. प्रमोद सोनवणेपशुवैद्यकीय अधिकारी, मनपा