शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दीर्घकालीन विचाराने ‘जीएसटी’चा लाभ

By admin | Updated: July 3, 2017 02:00 IST

नाशिक : वस्तू सेवा कर करप्रणाली प्रगत देशांनी अवलंबली आहे. या करामुळे गुंतवणुकीला फायदा होणार आहे,

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : वस्तू सेवा कर (जीएसटी) करप्रणाली जगभरातील प्रगत दहा देशांनी अवलंबली आहे. या करामुळे जागतिक गुंतवणुकीला फायदा होणार आहे, तसेच सुरुवातीचे एक ते दीड वर्ष देशाच्या अर्थव्यवस्थेत नैराश्य असले तरी दीर्घकाळाचा विचार करता ही क र अंमलबजावणी फायद्याची ठरणार असल्याचे मत सीए ओमप्रकाश सोमाणी यांनी व्यक्त केले.शरणपूररोड येथील वैराज कलादालनात जागतिक वास्तुविशारद दिनानिमित्त ‘आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिक’ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात सोमाणी यांनी ‘जीएसटी’ करप्रणालीबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. या करप्रणालीमुळे देशाचा आर्थिक विकासदर वाढण्यासही मदत होणार आहे, तसेच प्र्रत्येक राज्यानुसार आकारण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या करप्रणालीला यानिमित्ताने आळा बसणार आहे. ही करप्रणाली राबविताना देशव्यापी संगणकप्रणाली कशी साथ देते हेदेखील पाहणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सोमाणी यांनी अधोरेखित केले.या कायद्यात अधिकाधिक सुसूत्रता यावी यासाठी राज्य तसेच केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या विविध परवानग्यांबाबत उलगडा होणे आवश्यक असल्याचे सीए ओमप्रकाश सोमाणी यांनी सांगितले. नवीन करप्रणालीमुळे नेमके काय प्रश्न निर्माण होतील याबाबत अद्याप सर्वसामान्य नागरिकांमध्ये तसेच व्यावसायिकांमध्ये शंका आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संघटनेचे अध्यक्ष सचिन गुळवे यांनी ‘आर्किटेक्ट अ‍ॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशन, नाशिकतर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष योगेश कासार पाटील, सीए ओमप्रकाश सोमाणी, आर्कि टेक्ट डॉ. कृष्णभूषण महाशद्बे, अध्यक्ष सचिन गुळवे, सचिव चारूदत्त नेरकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्कि. रसिक बोथरा तर आभार आर्कि. चारूदत्त नेरकर यांनी मानले.