शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चौधरी कुटुंबीयांचा एकुलता एक हिंमत काळाने हिरावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:14 IST

सिडको : येथील अत्यंत गोरगरीब कुटुंबातील चाैधरी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा हिंमतचा वालदेवी धरणावरील घडलेल्या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला. ...

सिडको : येथील अत्यंत गोरगरीब कुटुंबातील चाैधरी कुटुंबाचा एकुलता एक मुलगा हिंमतचा वालदेवी धरणावरील घडलेल्या दुर्घटनेत बुडून मृत्यू झाला. या घटनेने त्याची आई सरला यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लहानपणीच पितृछत्र हरपल्याने हिंमतला त्याच्या आईने मोठे काबाडकष्ट करत त्याला वाढविले होते आणि त्याला चांगली नोकरी मिळेल आणि आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असे स्वप्न तिने बघितले होते. मात्र, काळाने हे स्वप्न तिच्या डोळ्यांतून कायमचेच हिरावून घेतले.

गेल्या अनेक वर्षांपासून सिडकोतील सिंहस्थनगर भागात भाड्याची खोली घेऊन राहणाऱ्या सरला चौधरी या गेल्या अनेक दिवसांपासून अंबड येथील एका खासगी कंपनीमध्ये जेमतेम पगारावर काम करीत आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे संचारबंदी, तसेच कडक निर्बंध लादण्यात आल्याने त्यांचे कामही बंद पडले आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा हिंमत हाच त्यांचा मोठा आधार होता. गेल्या अनेक वर्षांपासून काबाडकष्ट करीत असल्याने पुढील आयुष्य मुलगा हिंमतच्या हिमतीवर चांगले जाईल अन‌् सुखाचे क्षण भोगता येतील, अशी आशा बाळगून असलेल्या सरला यांच्या या आशेवर नियतीने पूर्णत: पाणी फिरविले. त्यांचा एकमेव आधार कायमचा हिरावून घेतला.

---इन्फो---

जेवणाचे ताटही वाढता- वाढता राहिले

वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत जात असल्याचे हिंमतने त्याच्या आई सरला यांना सांगितले असता आईने त्यास ‘थांब, दुपारचे जेवण कर अन्‌ मग जा, मी ताट वाढते...’ असे सांगितले. मात्र, त्याने आईला ‘जेवण नको, आई मी जेवलो आहे,’ असे सांगितले आणि हिंमत घराबाहेर पडला तो कायमचचाच...