शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

२८ पासून बेमुदत बंद : तहसीलदार संघटनेचा निर्णय

By admin | Updated: May 23, 2015 23:21 IST

पुरवठा खात्यावर कायमचा बहिष्कार

 नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणी सात तहसीलदारांना विनाचौकशी निलंबन करण्याच्या घटनेच्या निषेधार्थ पुरवठा खात्याच्या कामकाजावर कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्याबरोबरच विनाशर्त निलंबन मागे न घेतल्यास २८ मेपासून राज्यभर कामकाज बंद करण्याचा निर्णय राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या विभागीय बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तहसीलदारांच्या निलंबनाबाबत घेतलेल्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे घेण्यात आलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश बगळे होते. सात तहसीलदारांच्या निलंबनानंतर संघटनेची आगामी रूपरेषा व दिशा ठरविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक भेटीवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी तहसीलदारांची चौकशी करण्याची घोषणा केली, परंतु चौकशी न करताच तहसीलदारांना निलंबन करण्याचे कारण काय असा सूर लावण्यात आला. यापूर्वी आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांकरवी या घोटाळ्याची चौकशी करण्यात आली असून, त्यांनी आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. याचाच अर्थ सरकारचा आयएएस अधिकाऱ्यांवरही आता विश्वास राहिलेला नसून, चौकशी न करता निलंबन करण्यात आले, उद्या तहसीलदार दोषी न आढळले तर त्यांच्या नुकसानीच्या भरपाईचे काय? असा सवालही यावेळी करण्यात आला. निलंबित तहसीलदारांनी मॅटमध्ये धाव घेतल्यामुळे येत्या सोमवारी त्यावर काय निर्णय होतो त्यानंतर आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येईल. बैठकीस विभागातील सर्व नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)