शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

By admin | Updated: June 6, 2016 00:11 IST

चाऱ्याअभावी पशुधन धोक्यात !

खामखेडा : पावसाची खरी सुरु वात रोहिणी नक्षत्रापासून होते. रोहिणी नक्षत्र संपत आले तरी अजूनही पावसाची कुठलीही चिन्हे दिसत नसल्याने लांबलेल्या पावसामुळे आता शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबर चाराटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे असलेला अल्प चारा संपला आहे. विकतचा चारा घेऊन जनावरे पोसणे मुश्कील झाले आहे. तेव्हा जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.गेल्या वर्षी खामखेडा परिसरात शेतकऱ्यांनी सुरुवातीला जेमतेम पावसावर रब्बी पिकांची पेरणी केली होती. नंतर पावसाने दीड महिना दांडी मारल्याने रब्बीची पाहिजे त्या प्रमाणात पिके आली नाही. ऐन पिकांच्या कापणीच्या वेळेस पावसाने धुमाकूळ घातल्याने चारा पावसाच्या पाण्याने भिजून मका, बाजरीचा कडबा खराब झाला होता. त्यामुळे चाऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. शेतकऱ्याकडे साधारण मे महिन्यापर्यंत जनावरांना पुरेल एवढा चारा असतो. मे किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यानंतर साधारण पंधरा दिवसांनंतर सर्वत्र हिरवा चारा जनावरांना चरण्यासाठी शिवारात उपलब्ध होत असतो. परंतु चालू वर्षी मे महिना संपून जून महिना सुरू होऊन पाच-सहा दिवस झाले तरी पावसाचा कोठेही अंदाज दिसत नाही. शेतकऱ्यांकडचा चारासाठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे.अनेक शेतकरी दुसरीकडे कोठे हिरवा चारा मिळतो का, याचा तपास करीत आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या विहिरींना थोड्या फार प्रमाणात पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी ज्वारीच्या कडब्याची पेरणी केली. त्या हिरव्या कडब्याचे चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. साधारण एक ओळीचा भाव चार-पाच हजार रुपये झाला आहे. या एका ओळीत एक ट्रॅक्टर ट्रॉंलीभर चारा येतो. काही तुरळक शेतकऱ्यांकडे उसाचा चारा आहे. या उसाच्या एका सरीचे भाव (याला ग्रामीण भागात बेले म्हणतात) एक हजार ते पंधराशे रुपये झाला आहे. एका उसाच्या सरीत साधारण एक बैलगाडीभर चारा येतो. त्यामुळे सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्याला आपले महागडे पशुधन जगविणे मुश्कील झाले आहे. हिरव्या चाऱ्याचा भाव गगनाला भिडला आहे. तेव्हा तीन-चार शेतकरी एकत्र येऊन ज्वारी किंवा उसाची खरेदी करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करीत आहेत. आता सर्व पर्याय संपल्याने शासनाने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. (वार्ताहर)