शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

‘अथर्वशीर्षात गणेशाचे प्रकाशात्मक स्वरूप’

By admin | Updated: January 22, 2015 00:57 IST

‘अथर्वशीर्षात गणेशाचे प्रकाशात्मक स्वरूप’

पंचवटी : श्रीगणेश अथर्वशीर्षाचे पठण मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. श्रीगणेशाचे स्वरूप प्रकाशात्मक असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक तथा युवा संत डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. पंचवटीतील अमृतधाम परिसरातील औदुंबरनगर येथील दत्तमंदिर प्रांगणात मानव कल्याण मिशनतर्फे चारदिवसीय श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, सृष्टीचे बीज ओमकारातून निर्माण झाले आहे. त्यामुळे या ओमकाराच्या मंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे. श्रद्धा अंध नसते. त्यामुळे ती अंधश्रद्धा होत नाही. श्रद्धा असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होते. मनावर आघात होऊ नये यासाठी अथर्वशीर्ष उपयुक्त आहे. अद्वैत तत्त्वज्ञानाचे सार श्रीगणपती अथर्वशीर्षात आहे. वड ज्ञानाचे, औदुंबर भगवान शिवाचे, पिंपळ भगवान विष्णूचे प्रतीक असून, याला त्रिवेणी म्हणतात. या त्रिवेणीची संस्कृती जोपासण्याचे काम संत साहित्य करत आहे. अनुभव सांगता येतात परंतु अनुभूती सांगता येत नाही. वातावरण प्रसन्न बनविण्यासाठी शंखध्वनी, घंटी आवाजाचा उपयोग होतो, याच्या पाठीमागेदेखील विज्ञान असल्याचे डॉ. गुट्टे म्हणाले. यावेळी सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले. या कार्यक्रमास वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, नगरसेवक रुची कुंभारकर, रमेश वानखडे, मोहन सहाणे, मुकुंद क्षीरसागर, दिलीप अहिरे, दत्तात्रय बच्छाव, एकनाथ पगार, प्रभाकर दिंडोलकर, माणिक गुट्टे, भीमराव बोडके, अनिल सांगळे, किरण दराडे , ज्ञानेश्वर सोमासे, विलास कारेगावकर, राम अहेर यांच्यासह भाविक उपस्थित होते. प्रास्ताविक सोमनाथ बोडके यांनी केले. श्याम पिंपरकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)