शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने पाडला दोन बकऱ्यांचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:15 IST

देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते ...

देवगांव : टाकेदेवगाव परिसरात येल्याचीमेट शिवारात काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर या दोन पशुपालकांच्या दोन शेळ्यांचा बिबट्याने चार ते पाच दिवसांपूर्वी फडशा पाडला असून, ग्रामस्थांमध्ये बिबट्याची भीतीवह परिस्थिती निर्माण झाली असून, बिबट्याच्या धाकाने पशुपालक चिंतेत सापडला आहे. टाकेदेवगाव परिसरातील येल्याचीमेट शिवारात चार ते पाच दिवसांपूर्वी काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर यांनी आपल्या शेळ्या चारण्यासाठी वनविभागाच्या आरक्षित जंगलामध्ये चारत असताना, संध्याकाळच्या वेळी बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढविला. काळू धनगर व त्र्यंबक पाडेकर यांना शेळीच्या ओरडण्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी शेळीकडे धाव घेतली. शेळीचे लचके तोडत असलेल्या बिबट्याला या दोघांनी दगड-गोट्यांच्या साहाय्याने पिटाळून लावले. मात्र, बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने बाकीच्या वीस ते तीस शेळ्या सैरभैर पळत सुटल्या. पुन्हा बिबट्याने दुसऱ्या शेळीवर हल्ला चढवून तिचा फडशा पाडला.

-------------

आरक्षित जागेत बिबट्यासह इतर जंगली जनावरांचा वावर असल्याने, ती त्यांचीच जागा असल्यामुळे आपण त्या ठिकाणी पिंजरा नाही लावू शकत. बिबट्याने मनुष्यवस्तीकडे वाटचाल केल्यास मालकीहक्काच्या जागेमध्ये बिबट्यास जेरबंद करण्यास पिंजरा लावता येतो.

- खंडू दळवी, वनरक्षक, टाकेदेवगांव.