शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

महाजनपूर येथे बिबट्या पिंजऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:00 IST

सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वीच बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा संशयाने वनविभागाने तिसरा पिंजरा लावला आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये समाधान : तीन दिवसांत पकडला दुसरा बिबट्या

सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वीच बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा संशयाने वनविभागाने तिसरा पिंजरा लावला आहे.वनक्षेत्र कमी झाल्याने भक्षाच्या शोधात बिबट्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. गोदाकाठ भागात गोदावरीचे खोरे असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे लपण्यासाठी बिबट्या सातत्याने येतो; मात्र महाजनपूर, तळवाडे, भेंडाळी, औरंगपूर, बागलवाडी या शिवारात सातत्याने दुष्काळी परिस्थितीमुळे उसाचे क्षेत्र नाही, शिवाय टेकडी, डोंगर, दाट झाडी असे कोणतेही क्षेत्र बिबट्याला लपण्यासाठी नसल्याने बिबट्या या भागात आल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. नाशिक महापालिका, सिन्नर नगर परिषद आपल्या शहरी भागातील मोकाट कुत्रे पकडून या भागात सोडतात. कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर, शेतात फिरताना दिसतात. बिबट्याला इतर ठिकाणी भक्ष मिळत नसल्याने कुत्र्यांच्या मागोव्याने या भागात सातत्याने येत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. खरीप हंगामातील पिकांची कामे शेतात सुरू असल्याने पिकांना पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री शेतकºयांना शेतात जावे लागते. तीन दिवसांत दुसरा बिबट्या पकडला असून, आणखी एक असल्याचा संशय असल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. वनविभागाच्या अधिकाºयांनी बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा. पकडलेले बिबटे परत पुन्हा या भागात सोडले जात असल्याचा दावा केला जात आहे, तरी या भागात बिबटे सोडू नये अन्यथा गावातील नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा सरपंच आशा बळवंत फड यांनी दिला आहे. त्यानंतर येवला वनविभागाचे संजय भंडारे, कर्मचारी भय्या शेख, विजय टेकनर यांनी पिंजरा ताब्यात घेऊन बिबट्याला निफाडच्या वनविभागाच्या रोपवाटिकेत नेल्याचे समजते.