शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

आरोग्य, शिक्षणावर व्याख्यान उत्साहात

By admin | Updated: June 27, 2014 00:20 IST

आरोग्य, शिक्षणावर व्याख्यान उत्साहात

सिन्नर : विविध साथीच्या रोगांचा पावसाळ््यात प्रसार होतो. तो रोखण्यासाठी परिसर स्वच्छता महत्वाची आहे. पावसाच्या पाण्याने साचलेली डबकी डासांचे उत्पत्ती स्थान असल्याने अशी डबकी साचू नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे. विविध साथीचे रोग रोखण्यासाठी आपणच अधिक काळजी घ्यावी असे आवाहन पास्ते आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व्ही. के. केदार यांनी केले. तालुक्यातील सोनांबे येथील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या जनता विद्यालयात ‘आरोग्य शिक्षण’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. या प्रसंगी मुख्याध्यापक श्रीमती के. एम. मोरे व्यासपीठावर उपस्थित होत्या. केदार यांनी विविध साथीच्या रोगांची माहिती व प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितल्या. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करतानाच शेजारच्यांनाही तशी काळजी घेण्याची माहिती द्यावी असे आवाहन त्यांनी केले. डासांमुळे डेंग्यू, हिवताप, चिकणगुणिया आदी रोगांचा फैलाव होतो. पावसाळ््यात डबके साचतात, छपरावरील टायर, प्लास्टीकचे डबे यांच्यामध्ये पाणी साचून राहिल्यावर तेथे डास अंडी घालून डासांची पैसास वाढवितो. (वार्ताहर)हा डास मानवाला चावल्यास विविध रोंगाची लागन होते. असेही त्यांनी सांगितले. या रोगांची लक्षणे, उपचार व प्रतिबधक उपाययोजना याबाबत सविस्तर माहिती सांगितली. मुख्याध्यापक श्रीमती मोरे यांनी प्रास्ताविक केले. के. बी. ढोली यांनी आभार मानले. या प्रसंगी आर. जी. घुले, कीर्ती जाधव, एस. के. सुडके, बी. बी. उकाडे आदींसह शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. (वार्ताहर)