शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’महिलेची कारागृहात रवानगी

By admin | Updated: May 9, 2017 01:58 IST

मनमाड : बालिकेच्या अपहरण संशयित महिला आरोपी अनामिका सुरेशराम मांजी हिची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमनमाड : तपोवन एक्स्प्रेसमधील चारवर्षीय बालिकेच्या अपहरणाचा गुन्हा औरंगाबाद येथून मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. संशयित महिला आरोपी अनामिका सुरेशराम मांजी हिला मनमाड न्यायालयासमोर उभे केले असता, तिची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.कल्याण येथून परभणी येथे तपोवन एक्स्प्रेसने जात असलेल्या रामेश्वर माधव केंद्रे यांची चारवर्षीय बालिका ईश्वरी ही मनमाड रेल्वेस्थानकादरम्यान लघुशंकेसाठी आईसमवेत स्वच्छतागृहाकडे गेली होती. दरम्यान संशयित महिला अनामिका हिने ईश्वरीला उचलून घेत दुसऱ्या डब्यामध्ये निघून गेली. ईश्वरी गायब झाल्याचे लक्षात येताच तिच्या परिवारातील सदस्यांनी व प्रवाशांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. एका महिलेने उचलून पुढे नेल्याची माहिती प्रवाशांकडून समजल्याने शोध सुरू केला. काही डबे पार केल्यानंतर नगरसूल रेल्वेस्थानकानजीक आरोपी अनामिकाच्या ताब्यात ईश्वरी दिसली. नातेवाइकांनी अनामिकाच्या ताब्यातून बालिकेची सुटका केली. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलीस व रेसुब कर्मचाऱ्यांनी अनामिका हिला ताब्यात घेउन अटक केली. या प्रकरणी संशयीत आरोपी अनामिका सुरेशराम मांजी रा: झारखंड हिच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार मनमाड हद्दीत घडल्याने हा गुन्हा मनमाड लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.मनमाड लोहमार्ग पोलिसांनी आरोपी अनामिका हिची मनमाड उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. येथील न्यायालयासमोर उभे केले असता तिची मध्यवर्ती कारागृहात रवाणगी करण्यात आली आहे.