शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील लोकनेते : अण्णा भाऊ साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:01 IST

स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध चळवळींपैकी संयुक्त महाराष्टÑाची चळवळ ही एक मोठी लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या काळात मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत लोकमत जागृत करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले.

ठळक मुद्देअण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील योगदान लक्षणीय ठरते.

स्वातंत्र्योत्तर भारतातील विविध चळवळींपैकी संयुक्त महाराष्टÑाची चळवळ ही एक मोठी लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या काळात मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत लोकमत जागृत करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केले. त्यांच्यासह अन्य शाहिरांनीही महाराष्टÑातील जनचळवळीला सातत्याने स्फूर्ती दिली. संयुक्त महाराष्टÑ चळवळीत शाहिरांच्या वाणी, लेखणीने समाजमनात क्रांतीच्या ठिणग्या पडत होत्या. म्हणूनच अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्टÑ चळवळीतील योगदान लक्षणीय ठरते.शाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म १ आॅगस्ट १९२० रोजी वाटेगाव, जि. सांगली येथे अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अनुभवाच्या शाळेतच त्यांचे शिक्षण झाले. पोटापाण्यासाठी अण्णा मुंबईला आले. तेथून त्यांच्या साहित्य प्रवासाला गती मिळाली. अण्णांनी कथा, कादंबऱ्या, नाटके, प्रवासवर्णनं, पोवाडे, लावणी, लोकनाट्य या सर्व वाङ्मयाचे लेखन केले.अण्णा भाऊ साठे यांचे महाराष्टÑप्रेम त्यांच्या विविध रचनेतून आपणास जाणवते.ही भूमी असे कैकांची। संत महंताची।ज्ञानवंताची नररत्नाला जन्म देणार।। जी जीया पोवाड्यातून तसेचमहाराष्टÑ देशा आमच्या महाराष्टÑ देशा।आनंदवनभुवन तू भूवरी भूषणी भारतवर्षा।।अशा शाहिरीगीतांतून अण्णा भाऊ साठे यांनी महाराष्टÑाला भारताचे भूषण मानले आहे.अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीने त्या काळातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यातूनच १९४६ साली अण्णा भाऊ साठे, अमर शेख, द. ना. गव्हाणकर यांनी ‘लाल बावटा’ या कलापथकाची स्थापना केली. आणि त्या कलापथकाने १९५०-१९६० या काळात संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीची हाक बुलंद केली.‘माझी मुंबई’ हे अण्णांचे गाजलेले लोकनाट्य म्हणजे संयुक्त महाराष्टÑातील चळवळीचे प्रेरणा गीतच ठरले होते. शाहिरीतून अण्णा संघर्षाच्या ठिणग्या पेरतात याची धास्ती घेतलेल्या देसाई सरकारने अण्णांच्या कार्यक्रमावर बंदी घातली; परंतु अण्णा भाऊ साठे यांनी मोठ्या चातुर्याने तमाशाचे नामांतर ‘लोकनाट्य’ असे केले. आणि मुंबईत संयुक्त महाराष्टÑ परिषदेत शिवाजी पार्क मैदानावर हजारो लोकांसमोर माझी मुंबई हे संयुक्त महाराष्टÑाच्या संदर्भातील लोकनाट्य घुमले. त्याचा एवढा प्रभाव पडला की भिंतीवरच्या पोस्टर्समधून, घोषणांमधून, सभांमधून हे घोषवाक्यच होऊन बसले. माझी मुंबई या लोकनाट्यात विष्णू हा मराठी कामगार व मुनिमजी हा गुजराथी बनिया यांच्यातील संवाद असून, ‘मुंबई कोणाची’ या विषयीची जुगलबंदी म्हणजे हे लोकनाट्य आहे. ज्याप्रमाणे पंखाशिवाय गरूड नाही, नखाशिवाय वाघाचे अस्तित्व नाही तशीच मुंबईशिवाय महाराष्टÑाची कल्पनाच होऊ शकत नाही हा दुर्दम्य आत्मविश्वास अण्णांनी मराठी माणसांच्या मनामनात प्रज्वलित केला.‘माझी मैना गावावर राहिली’ या अण्णा भाऊ साठे यांच्या लावणीतील नायक आपल्या पत्नीच्या सौंदर्याचे वर्णन करतो व विरहाने व्याकूळ होतो अशी सौंदर्यवादी वाटणारी ही लावणी अलगदपणे आपल्या संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीच्या दृष्टीने चिंतनाकडे घेऊन जाते. आणि द्वैभाषिक मुंबई राज्यातही नसलेल्या बेळगाव, कारवार, निपाणी, उंबरगाव, डांग हा भाग महाराष्टÑापासून तोडल्याने खंडित महाराष्टÑाची अवस्था कशी झाली होती हे सांगतात. अशा पद्धतीने बेळगाव, कारवार, निपाणी तसेच डांग, उंबरगाव या भागातील मराठीजणांचे दु:ख अण्णांनी त्यावेळीच मांडले होते. याच लावणीत अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्टÑाच्या निर्मितीसाठी सर्वांनी एकतेने लढा चालू ठेवावा, असे आवाहन केले.अण्णा भाऊ साठे हे कलावंत म्हणून तसेच कम्युनिस्ट चळवळीचे नेते व लेखक म्हणून सर्वांगाने संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीत अग्रेसर राहिले. शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर व अण्णा या त्रिकुटाने पोलिसांची नजर चुकवून, शासनाचा बंदीहुकूम मोडून आपल्या शाहिरी व लोकनाट्यातून समाजमन जागृत केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५६ ला महानिर्वाण झाल्यानंतर अण्णांनी ‘जग बदल घालूनी घाव’ ही रचना लिहिली. त्याही रचनेत अण्णा भाऊ साठे यांच्या संयुक्त महाराष्टÑनिर्मितीच्या विचारांची छाप दिसून येते. नवमहाराष्टÑाच्या निर्मितीच्या या कार्यात एकजुटीने पुढे येण्याची हाक मराठी माणसांना देताना अण्णा म्हणतात-एकजुटीच्या या रथावरती।आरुढ होऊन चलबा पुढती।।नव महाराष्टÑ निर्मून जगती।करी प्रकट निज धाव।।जग बदल घालुनी घाव।सांगून गेले मज भीमराव।।अखेर संयुक्त महाराष्टÑाच्या चळवळीपुढे केंद्र सरकार नमले. २८ मार्च १९६० रोजी गृहमंत्री गोविंद वल्लभपंत यांनी लोकसभेत द्वैभाषिक राज्य भंग करण्याचे बिल मांडले. २१ एप्रिल १९६० रोजी लोकसभेने आणि २३ एप्रिल १९६० रोजी राज्यसभेने या बिलाला मंजुरी दिली व त्यानुसार १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे मुंबई हे राजधानी असणारे महाराष्टÑ आणि गुजराथी भाषिकांचे गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये उदयास आली.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचार व कार्याचे स्मरण करणे आणि महाराष्टÑाचे सुराज्य निर्माण करणे हीच अण्णांना आदरांजली ठरेल.- डॉ. सोमनाथ डी. कदम