शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मणगिरी महाराज पुण्यतिथी सोहळा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST

---------------------- सिन्नरला कर्पे नगरला नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा सिन्नर: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शनिवारपासून (दि. १३) माजी ...

----------------------

सिन्नरला कर्पे नगरला नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा

सिन्नर: छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शनिवारपासून (दि. १३) माजी आमदार राजाभाऊ वाजे नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्या पुढाकाराने या स्पर्धा होत आहेत. सरदवाडी रोड येथील कर्पे ग्राऊंड येथे स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ६४ संघांना प्रवेश देण्यात येणार असून प्रत्येक सामना ५ षटकांचा राहील. संघात आठ खेळाडू असणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघास ३१ हजार, २१ हजार आणि ११ हजार रुपयांचे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक दिले जाणार आहे.

-----------------

पूर्वसूचना न देता वीज खंडित

सिन्नर : ग्राहकांस पूर्वसूचना देणे बंधनकारक असताना बेकायदेशीररीत्या विद्युत पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष नामदेव कोतवाल यांनी केली आहे. कोतवाल हे बाहेरगावी असताना त्याच्यासह परिसरातील अनेकांचा वीजपुरवठा महावितरकडून खंडित करण्यात आला. याबाबत अनेकांनी लवकरात लवकर वीजबिल भरतो, असे आर्जव करुनही उर्मटपणाची उत्तरे दिल्याची तक्रार कोतवाल यांनी केली आहे. कोरोनाच्या काळात असलेली टाळेबंदी, वेतनकपात, नोकरी जाणे अशा दृष्टचक्रांत नागरिक अडचणीत आले असताना केलेली कारवाई अन्यायकारक असल्याचे कोतवाल यांचे म्हणणे आहे.

-----------

पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात

सिन्नर : सामान्य विद्यार्थ्यांची कुवत ओळखून त्यांना जागतिक स्तरापर्यंत पोहोचवणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठातील प्राध्यापक तशी प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. उद्धव आष्टुरकर यांनी केले. येथील सिन्नर महाविद्यालयात ७२ वा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. प्रा. डॉ. दत्तात्रेय फलके यांनी प्रास्ताविक तर एस. बी. कर्डक यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. अतुल गावंडे यांनी करून दिला. डॉ. सुरेखा जाधव यांनी आभार मानले.

-----------

गिन्नी गवतापासून जैव इंधन निर्मितीचा प्रकल्प

सिन्नर: इंधनाची सध्याची गरज आणि होणारा पुरवठा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. आणि ही तफावत दूर करण्यासाठी जैव इंधन हा सक्षम पर्याय ठरु पाहत असूून मीरा क्लीन फ्युएल्स लिमिटेड अंतर्गत वेल्दी हार्वेस्ट प्रोड्युसर कंपनीच्या वतीने तालुक्यातील मानोरी येथे हत्ती (गिन्नी) गवतावर प्रक्रिया करून त्यातून जैव इंधन व सेंद्रिय खत निर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यात येत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे. प्रतिटन १ हजार रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना या गवताचा दर कंपनीच्या वतीने दिला जाणार आहे. त्याचबरोबर जैव इंधन निर्मितीतून तयार होणारे ऑरगॅनिक खतही अल्प दरात शेतकऱ्यांना पुरवले जाणार आहे.