शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: May 12, 2017 23:34 IST

तळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व लक्ष्मीनगर रस्ता कॉँक्रिटीकरण लोकार्पण व जलयुक्त शिवार कामांना प्रारंभ करण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव रोही : चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे विविध विकासकामांचा शुभारंभ व लक्ष्मीनगर रस्ता कॉँक्रिटीकरण लोकार्पण व जलयुक्त शिवार कामांना प्रारंभ करण्यात आला. शुक्रवारी चांदवड-देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते हे कार्यक्रम झाले.  उपसरपंच बाबाजी वाकचौरे व दत्तू पाटील यांनी जलयुक्त शिवार याविषयी माहिती दिलीे. मागील वर्षी पाऊस चांगला झाला; मात्र यावर्षीच्या उन्हाच्या तीव्रतेमुळे विहिरींनी तळ गाठला आहे. पुढील वर्षी या भागातील जनतेला जलयुक्त शिवाराचा फायदा होऊ शकतो. यासाठी कामे करून घ्यावेत, असे मत जिल्हा परिषद सदस्य आत्माराम कुंभार्डे यांनी व्यक्त केले. आमदार राहुल अहेर यांनी सांगितले की, जलयुक्त शिवार योजनेत चांदवड तालुक्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला असला तरी अजूनही यापेक्षा अधिक कामे होणे गरजेचे आहे. पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी नागरिकांनी जलयुक्तची कामे चांगली करुन घ्यावी. प्रत्येक व्यक्तीने या योजनेत सहभाग घेऊन कामे करुन घ्यावी. लोकवर्गणीत किंवा जनतेच्या सहभागातून डिझेल व जेसीबी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आमदार अहेर यांनी केले. यावेळी कृषी सहायक संजय मोरे, पर्यवेक्षक बी.व्ही. कांबळे यांनी जलयुक्त शिवार योजनेसह विविध शासकीय योजानींची माहिती दिली. कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील शेलार, ज्येष्ठ नेते राधाजी पाटील भोकनळ, शहाजी पाटील भोकनळ, अंबादास केदारे, सरपंच शिवाजी पाटील, उपसरपंच बाबाजी वाकचौरे, राजू पाटील, दत्तू पाटील, पोलीसपाटील अविनाश अहिरे, तुकाराम वाकचौरे, शिवाजी वाकचौरे, सीताराम ठाकरे, बाळासाहेब गिते, निवृत्ती वाकचौरे, मधुकर केदारे, अशोक वाकचौेरे, शिवाजी डुमरे, बाळासाहेब भोकनळ, भाऊसाहेब हिरे, अंबादास वाकचौरे आदी उपस्थित होते. अंबादास केदारे यांनी सूत्रसंचालन केले.तळेगावरोहीचे ग्रामस्थ उपस्थित होते.