येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत व्यंकटेश जिनिंग प्रेसिंग प्रा. लि. कालामाथा, अंदरसूल येथील जिनिंग प्रेसिंग मिलच्या आवारात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत शासकीय हमीभावाने कापूस खरेदीचा शुभारंभ सोमवारी (दि.२३) कापूस पणन महासंघाच्या संचालिका व येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांच्या हस्ते काटा पूजन करून करण्यात आला. कापसाचा भाव ३९०० ते ४१०० पर्यंत होता. सर्वप्रथम अंदरसूल येथील शेतकरी अशोक धनगे यांच्या बन्नी एफक्यू या कापसास प्रतिक्विंटल ४१०० रुपये भाव मिळाला. येवला तालुक्यात कापूस उत्पादक पणन महासंघामार्फत शासकीय कापूस खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची कापूस विक्रीची चांगली सोय झाली आहे. या खरेदी केंद्रावर प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवार शासकीय खरेदी सुरू राहणार आहे. कापूस उत्पादक शेतकरी बांधवानी आपला स्वच्छ कापूस व्यंकटेश जिनिंग प्रेसिंग प्रा. लि. कालामाथा अंदरसूल या कापूस केंद्रावर विक्र ीस आणावा. ओला कापूस विक्रीस आणू नये स्वत:च्या नावाचा ७/१२ उतारा व त्यावर कापसाची नोंद तसेच राष्ट्रीयीकृत बँकेच्या पासबुकाची छायांकित प्रत आदि कागदपत्र कापूस विक्रीसाठी सोबत आणावे, असे आवाहन सभापती शिंदे, सचिव डी. सी. खैरनार यांनी केले आहे.याप्रसंगी जळगाव विभागाचे उपव्यवस्थापक आबासाहेब शिंदे, निकम, एन.जी. दीक्षित, नवनाथ काळे, मकरंद सोनवणे, भास्कर कोंढरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
अंदरसूल येथे कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
By admin | Updated: November 23, 2015 23:37 IST