शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरणातून मराठवाड्यासाठी शेवटचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:30 IST

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देनगरलाही पाणी देणार : चोरी रोखण्यासाठी गावे अंधारात

नाशिक : मे महिन्यात पाण्याची वाढलेली मागणी लक्षात घेता जिल्ह्णातील धरणांमध्ये जेमतेम १८ टक्के जलसाठा असतानाही गंगापूर धरण समूहातून मराठवाडा व नगर जिल्ह्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून शेवटचे आवर्तन सोडण्यास जिल्हा प्रशासनाने हिरवाकंदील दर्शविला असून, शेकडो किलोमीटर नदीमार्गे जाणाऱ्या या पाण्याची वाटेत चोरी होऊ नये म्हणून नदीच्या दुतर्फा वीजपुरवठा खंडित करण्याच्या त्याचबरोबर चोरी करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.सदरचे पाणी औरंगाबाद जिल्ह्णातील वैजापूर आणि अहमदनगर जिल्ह्णातील कोपरगाव, शिर्डी, राहाता या नगरपालिकांची तहान भागविणार आहे. त्यासाठी गंगापूर व दारणा समूहातील (गंगापूर, मुकणे, दारणा, वालदेवी) या धरणातून २ हजार १०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, सोमवारी सायंकाळी उशिरा गोदावरी व दारणा नदीमार्गे हे पाणी पुढे झेपावले. या पाण्याचा लाभ नाशिक शहरासह भगूर, कॅन्टोन्मेंट, सिन्नर एमआयडीसी, सायखेडा, चांदोरी, निफाड तालुक्यांसाठी होणार आहे. तसेच नांदूरमधमेश्वरमधून हे पाणी पुढे डाव्या व उजव्या कॅनॉलव्दारे वैजापूर, कोपरगाव, शिर्डी, राहात्याला पोहोचेल.याशिवाय सटाणा शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असून, निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी केळझर धरणातून सटाणा शहरासाठी १०० दलघफू पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. केळझर धरणातून आरम नदीमार्गे हे पाणी सोडण्यात येणार आहे. गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाचालू वर्षातील हे शेवटचे आवर्तन असल्याने ते संबंधित गावापर्यंत पोहोचावे, वाटेत या पाण्याची चोरी होऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाने पाटबंधारे विभागाला दिल्या आहेत. त्यासाठी आगामी पंधरा दिवस पाण्याच्या वहन मार्गावर रोज २२ तास वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच अवैध पाणी उपसा करणाºयांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.