शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्जांसाठी आज शेवटचा दिवस

By admin | Updated: February 6, 2017 00:45 IST

इच्छुकांची लगीनघाई : शिवसेना, राष्ट्रवादीकडे सर्वाधिक गर्दी

नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (दि. ६) अखेरचा दिवस असून, शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाऊगर्दी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७३, तर पंचायत समितीच्या १४६ गणांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १ ते ६ फेबु्रवारीदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती. त्यात एक तारखेला प्रत्यक्षात एकाही पंचायत समिती गणाला व जिल्हा परिषद गटाला अर्ज दाखल करण्यात आला नाही. केवळ आॅनलाइनसाठी सात अर्ज दाखल करण्यात आले होते. शनिवारी व रविवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या व पाचव्या दिवशी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना काही इच्छुकांनी चक्क त्या त्या पक्षाचे एबी फॉर्मही उमेदवारी अर्जासोबत जोडले होते. कोणत्याच राजकीय पक्षांनी त्यांच्या उमेदवारांची अधिकृत यादी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस अगोदरपर्यंत जाहीर केलेली नव्हती. कदाचित महापालिकेच्या उमेदवारी अर्जांचा गोंधळ लक्षात घेऊन अगोदरच त्या त्या पक्षांनी उमेदवारी निश्चित मानल्या गेलेल्या इच्छुकांकडेच एबी फॉर्म दिल्याची चर्चा होती. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी करण्यास सर्वाधिक गर्दी शिवसेना व राष्ट्रवादी कॉँग्रेसकडे असल्याचे बोलले जाते. मालेगाव, निफाड, सिन्नर व नाशिक या तालुक्यांत शिवसेनेत इच्छुकांची संख्या अधिक असून, या चारही तालुक्यांत उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तोच प्रकार राष्ट्रवादीच्या बाबतीत दिंडोरी, निफाड, येवला, नांदगाव, बागलाण, कळवण या तालुक्यांत होण्याची चिन्हे आहेत.