शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

२२ महिन्यांत सव्वा लाखाच्या बनावट नोटा

By admin | Updated: December 24, 2016 01:10 IST

नाशकात २१ गुन्हे दाखल : बँकांमधील प्रकार

 विजय मोरे नाशिकअर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात आलेल्या बनावट नोटा, अमली पदार्थांची खरेदी-विक्री तसेच भ्रष्टाचार यामुळे एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ ला रात्री जाहीर केला़ पंतप्रधानांच्या तीन मुद्द्यांपैकी बनावट नोटा या एका मुद्द्याचा विचार करता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील सात पोलीस ठाण्यांमध्ये २१ गुन्हे दाखल असून, बनावट नोटांची किंमत एक लाख १९ हजार ५० रुपये आहे़ शत्रूराष्ट्राकडून प्रतिस्पर्धी देशाची प्रगती रोखण्यासाठी अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे प्रयत्न केले जातात़ त्यासाठी प्रामुख्याने बनावट नोटांचा वापर केला जातो़ भारतीय चलनातही बनावट नोटांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाल्याने पंतप्रधानांनी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला़ शहर पोलीस आयुक्तालयाचा विचार करता १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत १६, तर १ जानेवारी ते ३१ आॅक्टोबर २०१६ या दहा महिन्यांच्या कालावधीत पाच असे २१ बनावट नोटांचे गुन्हे शहरातील सात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल करण्यात आले आहेत़ पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाण्यात सर्वाधिक आठ गुन्ह्यांची नोंद असून, नव्याने झालेल्या म्हसरूळ व मुंबई नाका पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ राष्ट्रीयीकृत बँकांची प्रमुख कार्यालये तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय नागरिकांची संख्या सातपूर परिसरात अधिक आहे़ शहर तसेच जिल्ह्यातील बँकांमध्ये ग्राहकांनी भरणा केलेल्या नोटांमध्ये बनावट नोटा असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जातो़ शहरात साधारणत: दर महिन्याला एक बनावट नोटेचा भरणा केला जात असल्याचे दिसून येते़