शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी टमाटे ८० रु. किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 01:16 IST

लासलगाव : टमाट्याच्या भावात वाढ सुरूच आहे. घाऊक बाजारात नेहमीच्या तुलनेत टमाट्याच्या भावात चौपटीने वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : टमाट्याच्या भावात वाढ सुरूच आहे. घाऊक बाजारात नेहमीच्या तुलनेत टमाट्याच्या भावात चौपटीने वाढ झाली आहे. लासलगाव येथील कृषी उतपन्न बाजार समितीत टमाटा प्रतिक्रेट ८०० ते १००० रुपयापर्यंत पोहोचला आहे. रविवारी आठवडे बाजारात टमाट्याची तब्बल ६० ते ८० रु पये किलो या भावाने विक्री झाली. त्यामुळे टमाटा, नको रे बाबा! असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे.  किरकोळ बाजारात २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टमाट्याचे भाव आता ६० ते ८० रु पयांवर पोहोचले असून, स्वयंपाकघरातून टमाटा गायब होत आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ४० ते ५० रु पये घाऊक भाव असला, तरी किरकोळ विक्र ेते दुप्पट रकमेने विक्र ी करीत आहेत. बाजार समितीमध्ये टमाट्याची आवक मागणीपेक्षा अगदी कमी असल्याने दर वाढलेले आहेत. टमाटा हा सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे टमाट्याला जास्त मागणी असते. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने भाव कडाडले आहेत. दोन महिन्यांपूर्वी २० ते ३० रुपयांत मिळणाऱ्या टमाट्याचे भाव आता ६० ते ८० रु पयांवर पोहोचले असून, वीस किलोच्या क्रेटला कृषी उत्पन्न बाजार समितीत ८०० ते १००० रु पयांचा दर मिळत आहे. सध्या बाजार समितीमध्ये दररोज ५० ते १०० क्रेट आवक होत आहे. त्या मुळे भावात वाढ होत आहे यंदा चांगला पाऊस झाल्याने १५ आॅगस्टपासून मोठी आवाक होण्याची शक्यचा वर्तविली जात आहे. सध्या उन्हाळ्यात ज्यां शेतकऱ्यांकडे पाणी होते त्यांचे टमाटे बाजारात विक्रीला येत आहेत. आवकच्या तुलनेत मागणी जास्त आहे. परिणामी भाव कडाडले आहेत. पुढील १५ दिवस अशीच स्थिती राहील, असा अंदाज वर्तविला जात आहे. नेहमीच्या तुलनेत आवक निम्म्याने घटली आहे.देवळ्यात कांद्याने ओलांडला हजाराचा टप्पालोहोणेर : देवळा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी कांद्याने प्रतिक्विंटल एक हजार रुपये भावाचा टप्पा पार केला असून, आज सर्वाधिक एक हजार एक रु पये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. यामुळे कांद्याबाबत शेतकरी वर्गाच्या आशा वाढल्या आहेत. गेल्या वर्षभर कांद्याचा भाव ५०० ते ७०० रु पयांदरम्यान व त्याच्या आतच घुटमळत राहिल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी होती. सोमवारी कांद्याच्या भावात बऱ्यापैकी वाढ झाली. देवळा येथील बाजार समितीत सोमवारी २५९ ट्रॅक्टर, ११४ पिकअप व पाच बैलगाड्यांमधून कांद्याची आवक झाली. प्रतिक्विंटल किमान ४५१ रु ., तर कमाल १००१ रु . असा भाव मिळाला. सरासरी ९०० रु . भाव होता. या भाववाढीमुळे शेतकरी सुखावला असला, तरी कांदा उत्पादन खर्च वसूल होण्यासाठी किमान १५०० रु . एवढा भाव मिळाला पाहिजे, असे मत यावेळी काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. आगामी दिवसात कांद्याचे भाव अजून वाढतील असा अंदाज काही कांदा उत्पादक जाणकार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आपला कांदा देवळा बाजार समितीत विक्र ीसाठी आणताना प्रतवारी करून आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती अशोक आहेर व सचिव दौलतराव शिंदे यांनी केले आहे.