शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

लंकेश हत्या; पुरोगामी संघटनांतर्फे मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:29 IST

‘प्रतिगाम्यांचा धिक्कार असो’, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना तत्काळ अटक करावी, या आशयाचे फलक प्रदर्शित करत शहरातील पुरोगामी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ७) सावरकरनगर येथून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

नाशिक : ‘प्रतिगाम्यांचा धिक्कार असो’, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या मारेकºयांना तत्काळ अटक करावी, या आशयाचे फलक प्रदर्शित करत शहरातील पुरोगामी संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. ७) सावरकरनगर येथून गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सावरकरनगर येथून सुरू झालेला हा मोर्चा जेहान सर्कल, प्रसाद मंगल कार्यालय सर्कल, विद्या विकास सर्कल, कुसुमाग्रज स्मारक या मार्गावर काढण्यात आला होता. कुसुमाग्रज स्मारक येथे या मोर्चाच्या समारोपप्रसंगी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. गणेश देवी यांनी गौरी लंकेश यांच्या हत्येची एसआयटीमार्फत तत्काळ चौकशी व्हावी, देशात सातत्याने होत चाललेल्या हत्या ही अतिशय निंदनीय बाब असून, संपूर्ण देशावर याची गडद छाया पसरत चालली असून, नागरिकांचे व्यक्तीस्वातंत्र्य धोक्यात येऊ लागल्याचे यावेळी सांगितले.गौरी लंकेश यांच्यासह डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या झालेल्या हत्यांचा निषेध जेवढ्या कडक शब्दात करू तेवढा कमी असल्याचे सांगताना आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा हल्ला ठरवून केला असल्याचेही देवी यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात अशा प्रकारचे खटले अतिशय कमकुवतपणे सुरू असल्याकडेही देवी यांनी यावेळी लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनी पुरोगामी विचारांची परंपरा संपलेली नसून, व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी असे पुरोगामी नेते पुढे येतच राहतील, असे सांगितले. मोर्चाच्या समारोपप्रसंगी अपरांती अकादमीचे संजय अपरांती, डॉ. डी. एल. कराड आदिंनी आपल्या मनोगतातून लंकेश यांच्या हत्येचा निषेध केला. मूक मोर्चाच्या समारोपप्रसंगी श्रीधर देशपांडे, अनिता पगारे, श्यामला चव्हाण, तानाजी जायभावे, मुकुंद दीक्षित, महेंद्र दातरंगे, वसंत एकबोटे, मिलिंद वाघ, संदेश भंडारे, वासंती दीक्षित यांच्यासह पुरोगामी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.