शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादनाचा तिढा; न्यायालयीन लढा नाशिक-सिन्नर चौपदरीकरणाला नवीन वर्षाचा मुहूर्त

By admin | Updated: May 24, 2014 00:43 IST

नाशिक : जादा मोबदला मिळावा म्हणून जागामालकांनी लवादाकडे घेतलेली धाव, जमीन देण्यास नकार देणार्‍यांना न्यायालयाचा दिलासा, तोंडावर आलेला पावसाळा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट पाहता नाशिक-पुणे चौपदरीकरणांतर्गत होऊ पाहणार्‍या नाशिक-सिन्नरचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा रस्ता रहदारीस उपयोगात येण्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे.

नाशिक : जादा मोबदला मिळावा म्हणून जागामालकांनी लवादाकडे घेतलेली धाव, जमीन देण्यास नकार देणार्‍यांना न्यायालयाचा दिलासा, तोंडावर आलेला पावसाळा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे सावट पाहता नाशिक-पुणे चौपदरीकरणांतर्गत होऊ पाहणार्‍या नाशिक-सिन्नरचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा रस्ता रहदारीस उपयोगात येण्याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. नाशिक-सिन्नर रस्त्याच्या चौपदरीकरणात भूसंपादनाचा मोठा अडसर ठरला असून, अठरा जागामालकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात येणार्‍या भूसंपादनाला विरोध दर्शविला परिणामी न्यायालयाने अठरा जागामालकांच्या ताब्यातील तीन हेक्टर जागा वगळून अन्य भूसंपादनातील मार्ग मोकळा केला, परंतु न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच चेहडी ते सिन्नर या टप्प्यातील जवळपास १८० आणखी जागामालकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. त्याच मार्गाने पाच ते सहा जागामालकांची वाटचाल असून, न्यायालयाने नव्याने कोणतेही आदेश याबाबत दिलेले नसले तरी, २६ जून रोजी त्याची सुनावणी ठेवली आहे. याचबरोबर १३० मालकांनी चौपदरीकरणासाठी जागा देण्याची तयारी दर्शविली परंतु शासनाने निश्चित केलेला दर कमी असल्याचे कारण सांगत वाढीव मोबदल्यासाठी लवादाकडे धाव घेतली आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने लवाद म्हणून जिल्हाधिकारी विलास पाटील यांची नेमणूक केली होती. परंतु लवादाचे काम पुढे सरकू शकले नाही. आता मात्र पुन्हा प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या असून, येत्या पंधरा दिवसांत लवादाची सुनावणी होण्याची शक्यता प्रशासकीय पातळीवर व्यक्तकेली जात आहे. नाशिकरोड उड्डाणपूल ते मुसळगाव औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या सुमारे १६ किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचा शुभारंभ गेल्यावर्षी जूनमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यासाठी भूसंपादन करून जागा ठेकेदाराच्या ताब्यात देण्याचा करार यापूर्वीच झाला आहे. परंतु आता जागेअभावी या रस्त्याचे काम येत्या वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता मावळल्याने आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक-सिन्नर-पुणे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कायम राहण्याची चिन्हे आहेत. इन्फोदिवसाकाठी दीड लाखाचा दंडल्ल नाशिक-सिन्नर रस्त्याचे चौपदरीकरण मुदतीच्या आत करण्याबाबत शासन व ठेकेदार चेतक एन्टरप्रायझेस या कंपनीत करार झाला असून, या करारात नमूद केल्याप्रमाणे सरकारने गेल्या फेब्रुवारीपूर्वी जागा संपादित करून ती कंपनीच्या ताब्यात देणे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांत कंपनीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे ठरविण्यात आले. जर कंपनीने मुदतीत काम पूर्ण केले नाही तर त्यांच्यावर दरदिवशी दंडाची आकारणी करण्यात येईल, पण जर शासनाने १ फेब्रुवारीपर्यंत जागा ताब्यात दिली नाही तर ठेकेदाराच्या होणार्‍या नुकसानीपोटी दर दिवशी शासन एक लाख ५६ हजार रुपये ठेकेदाराला भरपाई देईल असाही करार करण्यात आला आहे. शासनाकडूनच या कराराचे उल्लंघन झाल्याने गेल्या चार महिन्यांत जवळपास सव्वा कोटी रुपयांहून अधिक दंडाचा भुर्दंड शासनाला बसला आहे. इन्फोपावसाळा ते आचारसंहिताल्ल नाशिक-सिन्नर रस्त्याच्या भूसंपादनासाठी जेमतेम जागाच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हाती लागली असून, उर्वरित जागेचा न्यायालयीन वाद सुरू आहे. न्यायालयाची सुनावणी कधी पूर्ण होईल याविषयी निश्चित काही सांगता येत नाही. परंतु या उपरही जर सुनावणी झाली व निर्णय काहीही लागला तरी पावसाळा तोंडावर असल्याने अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर काम करणे मुश्किल होणार आहे. त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता अधिक आहे. जिल्हाधिकारी प्रमुख असलेल्या लवादाची सुनावणी आचारसंहितेच्या काळात करता येणार नाही, परिणामी लवादाचा निकाल लागेपर्यंत जमिनीचा ताबा देण्यास जागामालक तयार होणार नसल्याने या गदारोळातच डिसेंबर उजाडणार आहे.