शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धाजवळील दोन लाखांची रोकड लंपास

By admin | Updated: July 5, 2017 01:25 IST

नाशिकरोड : पायी जाणाऱ्या इसमाच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली पिशवी भामट्यांनी चोरून नेली.

नाशिकरोड : बिटको महाविद्यालय येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र येथून पायी जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली कापडी पिशवी मोटारसायकलवर आलेल्या दोघा भामट्यांनी ओढून चोरून नेली. शिखरेवाडीतील हरीओम सोसायटीत राहणारे महेंद्र यशवंत बानोडकर (६५) हे सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कामानिमित्त बिटको महाविद्यालय येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र येथून रस्त्याने पायी जात होते. पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघा भामट्या युवकांपैकी पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांच्या हातातील हिसकावून नेली. आधार-सीमकार्ड लिंक; गोडसे यांची मागणीनाशिक : गुन्हे शोधण्यासाठी आणि नियंत्रणासाठी आधार आणि मोबाइल सीमकार्ड परस्परांशी लिंक करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान समितीकडे केली. देशाच्या डिजिटल धोरणांबाबत २९ जूनला माहिती तंत्रज्ञान विभागाची बैठक झाली. बैठकीस समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, लालकृष्ण अडवानी, करूणाकरन, रावसाहेब दानवे, विनय सहस्त्रबुद्धे, रामदास तडस आदी खासदार उपस्थित होते. उद्योजक शिबिरातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शननाशिक : भारत सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अहमदाबाद येथील भारतीय उद्योजक विकास संस्था आणि मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र यांनी संयुक्तरीत्या मातोश्री महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित केलेल्या तीनदिवसीय उद्योजक जागरूकता शिबिराला सुरुवात झाली आहे. कत्तलखाना स्थलांतराची मागणीनाशिक : जुन्या नाशकातील महात्मा फुले मंडईतील कत्तलखाना वडाळा परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे केली आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी (दि.३) आयुक्तांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यात महात्मा फुले मंडईतील अनेक वर्षांपासून असलेला कत्तलखाना अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी वडाळा परिसरातील जागेचाही प्रस्ताव त्यांनी सुचविला. सुरक्षारक्षकाची नोंदणी करण्याच्या सूचनानाशिक : अनोंदीत सुरक्षारक्षक व त्यांना तैनात करणाऱ्या कारखान्यांच्या मालकांची जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात नोंदणी करण्याच्या सूचना कामगार उपआयुक्तकार्यालयाने केली असून, जे नोंदणी करणार नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राज्याच्या कामगारमंत्र्यांकडे राज्य सुरक्षारक्षक सल्लागार समितीची बैठक घेण्यात येऊन त्यात अनोंदीत सुरक्षारक्षक व त्यांना तैनात करणारे आस्थापना व कारखाने यांच्या मुख्य मालकांची नोंदणी मंडळात करावी, असे ठरविण्यात आले.