नाशिक : शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे़ उपनगर व इंदिरानगर परिसरातील दोन बंद घरांच्या दरवाजाचे कडी-कोयंडे तोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़घरफोडीची पहिली घटना तपोवन लिंकरोडवरील उत्तरानगर भागात घडली़ भूमिधारा सोसायटीतील रहिवासी दमयंतीबेन अमृतभाई रुदानी या सोमवारी (दि़२) दुपारी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या़ या कालावधीत चोरट्यांनी दरवाजाचे लॅच तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ९७ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दुसरी घटना इंदिरानगरमधील परबनगरमध्ये घडली़ येथील भाग्येश जोशी हे दि.२६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजाचा कडीकोयंडा तोडून ७५ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते आहे़ (प्रतिनिधी)
घरफोडीत दोन लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: January 3, 2017 23:58 IST