शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लाखलगाव पेट्रोलपंप दरोड्यातील टोळी जेरबंद

By admin | Updated: May 6, 2017 01:34 IST

पंचवटी : लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा टाकून तेथील लाख रुपयांची रोकड चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात आले आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : तीन महिन्यांपूर्वी लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर मध्यरात्रीच्या सुमाराला सशस्त्र दरोडा टाकून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण करीत सव्वादोन लाख रुपयांची रोकड जबरीने चोरून नेणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद करण्यात गुन्हा शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या दरोड्याप्रकरणी सात संशयितांना अटक केली आहे तर त्यांचे उर्वरित साथीदार पसार झाले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हा शाखेच्या युनिट एकच्या पथकाने मखमलाबाद शिवारातील मोबाइल चोरी करणारा संशयित नितीन पारधी (२३) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मातोरी गावातील सोमनाथ हिरामण बर्वे, सय्यद पिंप्रीतील अनिल भाऊराव पवार, मातोरी येथील नितीन विलास पिंगळे, मखमलाबाद कोळी वाड्यातील शुभम दशरथ गायकवाड, सातपूर येथील संभाजी विलास कवळे व पेठरोड नवनाथनगर येथील देवीदास मोतीराम पवार ऊर्फ गटल्या आदी सहकाऱ्यांच्या साहाय्याने तीन महिन्यांपूर्वी लाखलगाव शिवारातील गौरव पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयिताना ताब्यात घेतले असून उर्वरित संशयित पसार झाले आहेत. या टोळीने शहरात यापूर्वी मोबाइल चोरी तसेच अन्य लुटमारीच्या घटना व वाहनचोरी केल्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहायक पोलीस निरीक्षक एन. एन. मोहिते, जाकीर शेख, शरद सोनवणे, संजय सूर्यवंशी, विशाल काठे, विशाल देवरे, शांताराम महाले, चंद्रकांत सदावर्ते, संजय मुळक, संजय पाठक, सुभाष गुंजाळ, विलास गांगुर्डे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.४नाशिक : पाथर्डी मार्गे नाशिकरोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदीप गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून, वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. पाथर्डी ते वडनेर गेट या भागातील पथदीप तातडीने दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.