शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

राज्यात आजपासून ‘लेक शिकवा’ अभियान

By admin | Updated: January 2, 2017 23:10 IST

शासनाचे शाळांना परिपत्रक : २६ जानेवारीपर्यंत राबविणार विविध शैक्षणिक उपक्रम

पेठ :विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहून,तिचा साठा ज्यापाशी, तोच खरा धनवानवरील काव्यपंक्तीत विद्येचे महत्त्व सांगून स्त्रीशिक्षणाची मुहूर्तमेढ करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून (दि. ३) राज्यात ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी व परंपरांच्या जाळ्यात गुरफटलेल्या समाजात स्त्रीला तुच्छ व भोगवस्तू म्हणून पाहिले जात होते. अशा परिस्थितीत समाजाचा रोष पत्करून स्त्रियांना चूल व मूल यांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी सावित्रीबार्इंनी प्रयत्न सुरू केले. पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू करून त्यांनी या चळवळीचा पाया रचला. आजच्या विद्यार्थी व समाजाला सावित्रीबार्इंच्या सामाजिक कार्याची आवड व प्रेरणा मिळावी यासाठी राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापर्यंत ‘लेक शिकवा’ अभियान राबविण्याचा शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. मुलींच्या शिक्षणात खंड न पडणे, शिक्षणाला प्रतिष्ठा व अधिष्ठान प्राप्त करून देणे, स्थलांतरित मुलींच्या शिक्षणासाठी उपाययोजना राबविणे यासाठी या अभियानात विविध उपक्र म राबविण्यात येणार आहेत. ३ जानेवारी रोजी ग्रंथदिंडी काढून सावित्रीबार्इंना अभिवादन करण्यात यावे, अभियान काळात सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन व वाचन, वक्तृत्व स्पर्धा, वाचन प्रेरणा, माता व किशोरवयीन मुलींचे मेळावे  घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)