शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

अवयवदानाविषयी व्यापक जनजागृतीचा अभाव

By admin | Updated: August 12, 2016 23:08 IST

खर्चिक प्रक्रिया : याचक अधिक तर दात्यांची कमतरता

 भाग्यश्री मुळे नाशिकअवयवदानाच्या बाबतीत याचकांची मोठी प्रतीक्षा यादी व त्या तुलनेत दात्यांची संख्या कमी असे व्यस्त प्रमाण महाराष्ट्रासह नाशिकमध्येही पहायला मिळत असून आपल्या मृत्यूपश्चात नेत्र, त्वचा, किडनी, हृदय आदि अवयव दान करून वेदनामय जीवन जगणाऱ्या व्यक्तींना जीवदान देणारी अवयवदान मोहीम व्यापक होण्याची गरज दिसून येत आहे. रस्ते अपघात, घरगुती अपघात आदि विविध घटनांमुळे अपघात होऊन मेंदूमृत झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अवयवांचे गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्याची ही प्रक्रिया खर्चिक असल्यानेही आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्यांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येत असल्याचेही समोर आले आहे. अवयवदानाविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज असून ते दूर करण्याची नितांत गरज आहे. मृत्यूनंतर डोळे, त्वचा हे अवयव दान केले तर मृत व्यक्ती विद्रुप दिसते, पुढच्या जन्मी त्या व्यक्तीला ते अवयव देव देत नाही, अवयवदान व देहदान हे एकच आहे, अवयवदान हे मृत्यूनंतरच करता येते, जिवंतपणी अवयवदान केले तर आयुष्य कमी होते, दात्याला अपंगत्व येते, मेहनतीची कामे करता येत नाही अशा अनेक गैरसमजुती लोकांमध्ये असून त्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावेंसह ७ कार्यकर्ते, डॉ. भाऊसाहेब मोरे, आयएमए सारख्या संस्था अवयवदानाविषयी जनजागृतीचे काम करत असून प्रत्येकाने आजवर १५ ते २० जणांना अवयवदानासाठी तयार केले आहे. काही अपघात झाल्यास वा काही घटना घडल्यास व माझा मेंदू मृत झाल्यास माझे अवयव काढून घेऊन ते गरजूंना द्यावेत, अशा परवानगीचे कार्ड या व्यक्ती आपल्या खिशात बाळगत आहेत. याशिवाय या व्यक्तींची माहिती प्रत्यारोपणाची प्रक्रिया राबवणाऱ्या झेडटीसीसी या संस्थेलाही दिली जात आहे. आजच्या घडीला नाशिकसह महाराष्ट्रात हजारो रुग्ण किडनी, हृदय, त्वचा, डोळे आदि अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. ब्रेनडेड रुग्णांचे अवयव काढून घेण्यासाठी नॉन ट्रान्सप्लांट सेंटरची संख्या वाढणे गरजेचे आहे. ब्रेनडेड झालेल्या व्यक्तींबद्दलची माहिती शासनाला कळविण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून या मोहिमेत अडथळा येत आहे.