शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मनुष्यबळाचा अभाव : कचऱ्याचे साचले ढिगारे, देखभालीअभावी यंत्रणा नादुरुस्त,

By admin | Updated: December 20, 2014 00:35 IST

मोकाट जनावरांचा मुक्तसंचारखतप्रकल्प : कधी सुरू, कधी बंद

 नाशिक : त्र्यंबकेश्वरचा कचरा स्वीकारण्यापूर्वी खतप्रकल्प तरी पूर्ण क्षमतेने चालविला जातो आहे काय, असा सवाल गुरुवारी झालेल्या महासभेत सदस्यांनी उपस्थित केला होता. हाच प्रश्न घेऊन ‘लोकमत’ने खतप्रकल्पावर भेट देऊन कानोसा घेतला असता प्रकल्प बंद स्थितीत आढळून आला तर तेथे हजर असलेल्या कामगारांनी प्रकल्प कधी सुरू, कधी बंद असल्याचे सावधपणे उत्तर दिले. खतप्रकल्पावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचले असून, पोकलॅन, जेसीबीसह अनेक मशिनरी नादुरुस्त होऊन पडल्याचेही निदर्शनास आले. याशिवाय तयार खताच्या गोण्याही थप्पीला लागलेल्या दिसून आल्या.त्र्यंबकेश्वरचा कचरा स्वीकारण्यापूर्वी आपला खतप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जातो आहे किंवा नाही याचा जाब सदस्यांनी महासभेत प्रशासनाला विचारला होता. खतप्रकल्प हा कचरा डेपो बनला असून, कचऱ्याचे ढिगारे साचत असल्याने परिसरातील ग्रामस्थांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती आता त्र्यंबकेश्वरच्या कचऱ्यामुळे उद्भवणार असल्याने ग्रामस्थांनी आणखीणच धसका घेतला आहे. खतप्रकल्पावर दुपारच्या सुमारास पाहणी केली असता खतप्रकल्प बंद स्थितीत आढळून आला. तेथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी उत्तरे देणे टाळले. सदर मशीन नादुरुस्त असून, इंजिनिअरला दुरुस्तीसाठी बोलाविले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. खतप्रकल्पावर ठिकठिकाणी कचरा आढळून आला याशिवाय या कचऱ्यावर मोकाट जनावरांचा जथ्थाही ताव मारताना दिसून आला. खतप्रकल्पावर ठिकठिकाणी पोकलॅन, जेसीबी यासारखी कोट्यवधी रुपयांची मशिनरी धूळ खात पडून दिसून आली, तर काही मशिनरी नादुरुस्त होऊन पडलेली आढळून आली. खतप्रकल्पावर रोज कचऱ्यावर प्रक्रिया होऊन खतनिर्मिती होत असल्याचा आणि खताला लगेचच उठाव असल्याचा दावा प्रशासनाने केला; परंतु खतप्रकल्पावर खतांच्या गोण्यांच्या थप्प्या पाहायला मिळाल्या.