शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
3
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
4
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
5
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
6
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
8
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
9
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
11
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
12
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
13
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
14
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
15
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
16
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
17
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
18
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
19
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
20
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा

मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:35 IST

नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा जनस्थान जाहीर करण्यात आला ...

नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना यंदाचा प्रतिष्ठेचा जनस्थान जाहीर करण्यात आला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर दोन वर्षांनी दिला जाणारा हा सन्मान दि. १० मार्च २०२१ रोजी प्रदान करण्यात येणार असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष ॲड. विलास लोणारी यांनी सांगितले.

कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. या प्रतिष्ठेच्या सन्मानाचे स्वरूप १ लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे आहे. दरवर्षी हा सन्मान कुसुमाग्रजांच्या जयंतीला अर्थात २७ फेब्रुवारीला प्रदान केला जातो. मात्र, यंदा प्रथमच हा सन्मान १० मार्चला स्मृतीदिनी प्रदान केला जाणार असल्याचे ॲड.लोणारी यांनी सांगितले. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे स्नेही पद्मश्री सन्मानप्राप्त मधु मंगेश कर्णिक हे कथाकार, कादंबरीकार, कवी, संवादलेखक म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. ज्येष्ठ कवी केशवसुत यांचे कोकणातील मालगुंड येथे स्मारक उभारणीत मधु मंगेश कर्णिक यांचे मोठे योगदान आहे. गोवा शासनाच्या प्रसिद्धीखात्यात माहिती अधिकारी, मुंबईला राज्य शासनाचे जनसंपर्क अधिकारी, तसेच काहीकाळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी म्हणूनही त्यांनी कामकाज केले. १९९० रत्नागिरीत झालेल्या ६४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मानही त्यांना मिळाला असून, ग. दि. माडगूळकर प्रतिष्ठानच्या गदिमा पुरस्कारानेही त्यांना २०१० मध्ये गौरविण्यात आले आहे, तसेच २०१४ ते २०१९ या काळात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. अनेक कथासंग्रहासह करूळचा मुलगा हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. घोषणेप्रसंगी कार्यवाह मकरंद हिंगणे, विश्वस्त आर्कि. संजय पाटील, अरविंद ओढेकर, गुरुमीत बग्गा, ॲड.अजय निकम, प्रा.हर्षवर्धन कडेपूरकर आदी उपस्थित होते. निवड समितीत विजय कुवळेकर, नीलिमा गुंडी, बाळकृष्ण कवठेकर, संतोष शेणई, प्रफुल्ल शिलेदार, मुकुंद संगोराम, शेखर गोडबोले, डॉ.विलास खोले, नीरजा यांचा समावेश होता.

इन्फो

माजी अध्यक्षांना प्रथमच ‘जनस्थान’

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष असलेल्या कर्णिक यांना यंदाचा जनस्थान जाहीर झाल्याने, प्रथमच प्रतिष्ठानच्या एका माजी अध्यक्षास हा सन्मान दिला जाणार आहे. यापूर्वी जनस्थान विजय तेंडुलकर (१९९१), विंदा करंदीकर (१९९३), श्रीमती इंदिरा संत (१९९५), गंगाधर गाडगीळ (१९९७), व्यंकटेश माडगूळकर (१९९९), श्री. ना. पेंडसे (२०११), मंगेश पाडगावकर (२००३), नारायण सुर्वे (२००५), बाबूराव बागुल (२००७), ना. धों. महानोर (२००९), महेश एलकुंचवार (२०११), भालचंद्र नेमाडे ( २०१३), अरुण साधू (२०१५), विजया राजाध्यक्ष (२०१७), वसंत आबाजी डहाके (२०१९) यांना प्रदान करण्यात आला आहे.

इन्फो

गोदावरी गौरव २७ फेब्रुवारीला

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दर दोन वर्षांनी होणारा गोदावरी गौरव पुरस्कार सोहळा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी पुढे ढकलण्यात आला होता. ते पुरस्कार यंदा २७ फेब्रुवारीला प्रदान करण्यात येणार आहेत. त्यात डॉ.माधव गाडगीळ (विज्ञान), भगवान रामपुरे (शिल्प), श्रीगौरी सावंत (लोकसेवा), दर्शना जव्हेरी (नृत्य), सई परांजपे (चित्रपट), काका पवार (क्रीडा) यांचा सन्मान केला जाणार आहे.