शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा : त्र्यंबकेश्वरच्या अहल्या धरणाची अवस्था बिकट

By admin | Updated: April 18, 2015 23:43 IST

घाट बांधले,पाण्याचे काय?

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात शाहीपर्वणीच्या दिवशी स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये अहल्या नदीवर घाट बांधण्यात येत असले तरी, स्नानासाठी पाणी कोठून आणणार, असा सवाल स्थानिक नागरिकांनीच केला आहे. त्र्यंबकेश्वर शहराची पाण्याची तहान भागविण्यासाठी अहल्या धरण बांधण्यात आले असून, त्यानंतर दुर्लक्षित झालेल्या धरणाची साठवण क्षमताही कमी झालेली आहे. सिंहस्थात पाऊस न झाल्यास स्नान कसे होणार, अशी विचारणा केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे तीन ठिकाणी भाविकांच्या स्नानासाठी घाट बांधले जात असून, त्यातील एक मोठा घाट अहल्या नदीवर बांधण्यात आला आहे. ज्या ठिंकाणी घाट आहे, त्याला लागूनच अहल्या धरण आहे. त्र्यंबक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अहल्या धरणाचे बांधकाम केल्यानंतर या धरणाकडे आजवर दुर्लक्षच झाले असून, डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या धरणाची निम्म्याहून अधिक जागा गाळाने घेतल्याने त्याची साठवण क्षमताही संपली आहे. धरणातून पाणी सोडण्यासाठी बसविण्यात आलेले दरवाजेही मोडकळीस आल्याने पाण्याची गळती होत आहे. धरणाला संरक्षण भिंत नसल्याने त्याची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मद्यपी व टवाळखोरांकडून धरणाच्या पाण्यात घाण टाकली जात असल्याने धरणाचे व पर्यायाने अहल्या नदीचे पावित्र्यही भंग पावले आहे. असे असताना धरणाला लागून घाट बांधण्यापेक्षा या धरणाचीच देखभाल-दुरुस्ती करून त्याची साठवण क्षमता वाढवली, तर त्या पाण्याचा कायमस्वरूपी उपयोग होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यातही धरणानजीक बांधण्यात आलेला घाट हा स्नानासाठी असल्याने धरणात पाणी आले, तरच या घाटाचा उपयोग होऊ शकतो. जर पाऊस पडला नाही तर काय? असा प्रश्नही त्या अनुषंगाने विचारला जात आहे. सध्या या धरणाने तळ गाठला असून, मृत साठा तेवढा शिल्लक राहिला आहे. (प्रतिनिधी)