नाशिक : श्री स्वामी समर्थ अध्यात्म कें द्राने संस्कृती संस्कार जोपासण्याची परंपरा कायम ठेवली असून, आता अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आणि शेतीला पाठबळ देण्यासाठी सेवामार्गातील पुढाकार घेतल्याने कृषी विकास साधला जाऊन शेतकऱ्यांना आत्मिक बळ मिळेल. अल्प खर्चात चांगले उत्पन्न देणाऱ्या नैसर्गिक शेतीकडे शेतक ऱ्यांचा कल वाढलेला असल्याने सहकार क्षेत्रातून शेतीचे मार्गदर्शन उपलब्ध झाल्यास नैसर्गिक शेतीला गती मिळेल, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. येथील डोंगरे वसतिगृह मैदानावर श्री स्वामी समर्थ कृषी विक ास व संशोधन चारिटेबल ट्रस्ट व शासनातर्फे आयोजित पाच दिवसीय जागतिक कृषिमहोत्सवात रविवारी (दि. २४) नैसर्गिक शेती या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर अण्णासाहेब मोरे, नैसर्गिक शेती अभ्यासक जितेंद्र कुटमुतिया विलास सनेर उपस्थित होते.अविरत निसर्गाच्या सानिध्यात समाजाला अन्नधान्य देणारा शेतकरी निसर्गाचा खरा उपासक आहे. मात्र तरीही त्याला नैसर्गिक शेतीविषयी संपूर्ण माहिती नाही. त्यामुळे निसर्ग शेतीची शेतकऱ्यांना प्राथमिक माहिती देण्याची गरज असून, पंचमहाभुतांवर आधारित शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असल्याचे कर्नाटकचे नैसर्गिक शेतीतज्ज्ञ सुरेश देसाई यांनी सांगितले. गुजरातचे नैसगिक शेतीतज्ज्ञ नरेश सावे म्हणाले, रासायनिक सेंद्रीय आणि नैसर्गिक शेती असे शेतीचे तीन प्रकार असून, सध्या रासायनिक शेतीवर भर दिला जातो. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम दिसत आहेत. तुलनेत नैसर्गिक शेती ऊन, वारा, पाणी, जमीन या घटकांवर आधारित असून, या पद्धतीत शेती संपूर्णत: निसर्गावर अवलंबून असल्याने पीक चांगले येते आणि हे उत्पादन आयोग्यालाही पोषक असते. तत्पूर्वी अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते नैसर्गिक कृषी पुरस्कार कुरेशी शेख व ओमप्रकाश कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी शेती अभ्यासक, शेतकरी, श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे सेवेकरी आणि नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कृषिमहोत्सव : हषवर्धन पाटील यांचे प्रतिपादन
By admin | Updated: January 24, 2016 22:43 IST