शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव महापालिकेत कोविड व्यवस्थापन कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:13 IST

मालेगाव : महानगरपालिकेद्वारे जुन्या महापालिका इमारतीत तळ मजल्यावर कोविड व्यवस्थापन कक्षाचे (वाॅर रूम) औपचारिक उद्घाटन कृषिमंत्री दादा ...

मालेगाव : महानगरपालिकेद्वारे जुन्या महापालिका इमारतीत तळ मजल्यावर कोविड व्यवस्थापन कक्षाचे (वाॅर रूम) औपचारिक उद्घाटन कृषिमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. कोविड विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी मुकाबला करून लढण्यासाठी व नागरिकांना आवश्यक माहिती पुरविण्यासाठी मालेगाव महापालिकेच्या वतीने जुन्या इमारतीत कोविड व्यवस्थापन कक्षाची रंगीत तालीम घेऊन बुधवारी कक्ष सुरू करण्यात आला आहे. हॉस्पिटल आणि मेडिकल स्टोअर्सवर उपलब्ध असलेल्या रेमडेसिविरचा साठा नागरिकांना दर्शविण्याची सोयही करण्यात आली असून, आरोग्य विभागामार्फत त्यावर कार्यवाही सुरू करण्यात येऊन नजीकच्या काळात उपलब्ध साठा नागरिकांना ऑनलाइन दिसू शकणार आहे.

कोविड व्यवस्थापन कक्ष २४ तास सुरू राहणार आहे. त्यात तीन सत्रांत प्रत्येकी दोन कर्मचारी उपस्थित राहणार असून, त्यांच्या सोबत महसूल व पोलीस प्रशासनाचा प्रत्येकी एक कर्मचारीही उपस्थित राहणार आहे. कर्मचारी यांच्याकडे नागरिकांच्या मदतीसाठी ८९५६ ४४३०६८ व ८९ ५६ ४४३० ७० हे भ्रमणध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. नागरिकांनी या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. संपूर्ण कोविड व्यवस्थापन कक्षावर साहाय्यक आयुक्त तुषार आहेर यांचे नियंत्रण राहणार आहे. कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी, तथा प्रभारी महापालिका आयुक्त धनंजय निकम, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, उपमहापौर नीलेश आहेर, उपायुक्त (विकास) नितीन कापडणीस व उपायुक्त (मुख्यालय) रोहिदास दोरकुलकर, सहा. आयुक्त तुषार आहेर, वैभव लोंढे, आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, लेखा परीक्षक राजू खैरनार, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, जनसंपर्क अधिकारी दत्तात्रेय काथेपुरी, संगणक विभाग प्रमुख सचिन महाले आदींसह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

------------------

कोरोनासाठी मनपाचे नवीन संकेतस्थळ

शहरात वाढणारी कोविड रुग्णसंख्या लक्षात घेता महानगरपालिकेतर्फे शहरातील नागरिकांना विविध शासकीय आणि खाजगी कोविड रुग्णालयांतील उपलब्ध बेड्सची माहिती मिळणे कामी smartmalegaon.in ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे. या वेवसाईटवर हॉस्पिटलनिहाय ऑक्सिजन, आय.सी.यू. आणि व्हेंटिलेटर बेडची संख्या दर्शविण्यात येत आहे. ही वेबसाईट मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे अधीक्षक अभिजित पवार यांच्या संकल्पनेतून बनविण्यात आली आहे.

-----------------------

नागरिकांना रियल टाइम माहिती मिळण्यासाठी प्रत्येक हॉस्पिटलला स्वतःचे ऑनलाइन अकाउंट देण्यात आले असून, यामुळे पेशंट दाखल किंवा डिस्चार्ज होताच संबंधित इस्पितळ त्यांची बेडसंख्या तातडीने अपडेट करू शकणार आहे. नागरिकांना हॉस्पिटलने सर्वांत शेवटी अपडेट केलेली बेडसंख्या, वेळ व तारखेसह दिसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

---------------------

---------------

मालेगाव महापालिकेत कोविड व्यवस्थापन कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे. समवेत प्रभारी आयुक्त धनंजय निकम, उपायुक्त नितीन कापडणीस, डॉ. सपना ठाकरे आदी. (१४ मालेगाव १)

===Photopath===

140421\14nsk_28_14042021_13.jpg

===Caption===

१४ मालेगाव १