शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात टिमक्यांना नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: March 11, 2017 00:41 IST

येवला यंदाही कांद्यासह शेतमालाला भाव नाही आणि नोटाबंदीमुळे बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह काहीसा कमी झाल्याने त्याची झळ होळीच्या टिमकीला बसली आहे.

 दत्ता महाले  येवलाकोणताही सण असो की उत्सव तो वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची संस्कृती जपण्यासाठी येवलेकर उत्साही असतात. परंतु गेल्या वर्षी दुष्काळी स्थितीमुळे होळी सणालादेखील दुष्काळाचे चटके बसले होते. यंदाही कांद्यासह शेतमालाला भाव नाही आणि नोटाबंदीमुळे रोकडची टंचाई भासत असल्याने बाजारपेठेत शांतता दिसून येत आहे. त्यामुळे लोकांचा उत्साह काहीसा कमी झाल्याने त्याची झळ होळीच्या टिमकीला बसली आहे.जिल्ह्यासह सर्वदूर टिमकीला मागणी कमी झाली आहे. येवल्यात होळीचा सण ही आगळा-वेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. होळी रे होळी, पुरणाची पोळी असे आपण होळी सण जवळ आला की म्हणत असतो. होळी सणाला अनिष्ठ प्रथा, चालीरीती, रु ढी, परंपरा यांचा नायनाट व्हावा यासाठी होळीजवळ बोंबा मारण्याची प्रथा आहे. म्हणूनच होळीला टिमक्या वाजविल्या जातात असे म्हटले जाते. लहान मुलांना टिमकी या देशी वाद्याचे मोठे आकर्षण असते. जनावरांच्या कातड्यांपासून शहरातील चर्मकार समाज टिमक्या बनविण्याचे काम करतो. होळी सणानिमित्त टिमक्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पंधरा दिवस अगोदरच चर्मकार समाजातील पुरे कुटुंब गेल्या सात दिवसांपासून टिमक्या बनवण्यासाठी सज्ज झालेले असतात. येवल्यात दरवर्षी सुमारे सात ते आठ हजारांच्या आसपास बनविल्या जातात. त्यानंतर सदर टिमकीला आकर्षक रंग, नक्षीकाम केले जाते. २०० ते २५० रुपयांना कातडे मिळते. एका कातड्यात १० ते १२ टिमक्या होतात. टिमक्यांसाठी लागणारी लोखंडी पट्टीचाही भाव आज महागाईच्या काळात ४० रुपये किलोपेक्षा अधिक झाला आहे. आज होलसेलच्या भावात टिमकी ४० ते ८० रुपयापर्यंत मिळते.