शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

किसान क्रांती मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक

By admin | Updated: May 13, 2017 00:25 IST

नाशिक : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी किसान क्रांती मोर्चातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारने सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी किसान क्रांती मोर्चातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला धडक दिली. शासनाने गांभीर्याने प्रश्न न सोडविल्यास एक जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला.  जिल्हा परिषद सदस्य अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली दुपारी शहरातील बी. डी. भालेकर येथून शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलिसांनी अडवला. अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे पीक कर्ज, वाढत्या आत्महत्या या साऱ्या विषयांशी संलग्न फलक हातात घेतलेल्या शेतकऱ्यांकडून सरकारविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.  शासनाने या मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा एक जूनपासून शेतकरी संपावर जातील, असा इशाराही देण्यात आला. या मोर्चात बाळासाहेब गुजर, बाळासाहेब पुंड, सुभाष जाधव, अनिल सोनवणे, दशरथ सांगळे, नामदेव डांगळे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब निंबाळकर, लहानू मेमाने, शशिकांत आवारे, शशिकला अडसरे, रामदास वाढवणे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. जिल्हा बॅँकेचे अधिग्रहण करावेशिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांचीच भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, ज्या शेतकऱ्यांचे जिल्हा बॅँकेत खाते आहेत त्यांच्या खात्यावरील रक्कम राष्ट्रीयीकृत बॅँकांमध्ये वर्ग करण्यात यावे, राष्ट्रीयीकृत बॅँकेत जिल्हा बॅँकेचे अधिग्रहण करण्यात यावे, शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बॅँकांनी कर्जपुरवठा करावा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात यावी, बाजार समित्यांकडून शेतकऱ्यांना विकलेल्या मालाचे पैसे त्वरित दिले जावेत, ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, अखंडित वीजपुरवठा करावा, खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.