वणी : नाशिक पंचवटी भागातील म्हसरु ळ येथे शिक्षण घेणाऱ्या व परमोरी या मुळ गावातील घरातुन गायब झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निखिल सुरेश जाधव (१६) राहणार परमोरी तालुका दिंडोरी हा नाशिक शहरातील म्हसरु ळ येथे शिक्षण घेत असुन शिक्षणानिमित्ताने त्याचे वास्तव्य तेथील एका होस्टेलमधे आहे. दरम्यान सुट्यांच्या कालावधीत तो परमोरी या आपल्या मुळ गावी कुटुंबियांना भेटण्यासाठी आला होता. दरम्यान निखिलचा भाऊ राहुल व वडील हे कामानिमित्त बाहेर गेलेले व आई बाजारासाठी लखमापुर येथे गेली असताना सायंकाळी सर्व घरी परतले त्यावेळी निखिल हा घरात नसल्याचे निदर्शनास आले. आजुबाजुला व नातेवाईक मित्र-परीवार यांचेकडे शोध घेतला मात्र निखिल बद्दल कोणतीही समाधानकारक माहीती मिळाली नाही.काळजीत पडलेल्या कुटुंबाने पोलीसांत धाव घेतली व घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने निखिलला पळवुन नेल्याची तक्र ार त्याचा भाऊ राहुल जाधव यानी पोलिसांना दिल्याने सदर विद्यार्थ्याच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:31 IST
वणी : नाशिक पंचवटी भागातील म्हसरु ळ येथे शिक्षण घेणाऱ्या व परमोरी या मुळ गावातील घरातुन गायब झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोळा वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण
ठळक मुद्देवणी : अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल