शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

खोबरे महागले, खोबरेल तेलही महागणार! नारळ उत्पादनात घट : अवकाळी पाऊस, गारपिटीचा परिणाम

By admin | Updated: May 24, 2014 01:03 IST

नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका नारळाच्या पिकालाही बसला असून, गेल्या दोन महिन्यांत खोबर्‍याचे दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी, खोबरेल तेलाच्या दरातही वाढ झाली असून, तेल उत्पादक कंपन्यांनी आणखी दरवाढीचे संकेत दिले आहेत.

नाशिक : अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका नारळाच्या पिकालाही बसला असून, गेल्या दोन महिन्यांत खोबर्‍याचे दर दुपटीने वाढले आहेत. परिणामी, खोबरेल तेलाच्या दरातही वाढ झाली असून, तेल उत्पादक कंपन्यांनी आणखी दरवाढीचे संकेत दिले आहेत. कोकण तसेच केरळ, तामिळनाडू भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे यंदा नारळाचे उत्पादन घटले आहे. कोकणातील रत्नागिरी परिसरात मोठ्या प्रमाणावर नारळाचे उत्पादन होते; परंतु यंदा माकडांच्या टोळ्यांनी नारळपिकाला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केल्याने नारळाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, अवकाळी पावसानेही पिकाला फटका बसला आहे. केरळमध्ये नारळाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते; परंतु उन्हाळ्यात केरळमधून कच्च्या शहाळ्यांना जास्त मागणी वाढल्याने उत्पादकांनी कच्च्या मालातूनच कमाईला पसंती दिल्याने नारळाची आवक घटली आहे. नारळाच्या पिकावर परिणाम झाल्याने खोबर्‍याचे भाव गेल्या दोन महिन्यांत दुपटीने वाढले आहेत. दोन महिन्यांपूर्वी फटका राजापुरी (काळी पाठ) व मद्रास (लाल पाठ) खोबर्‍याचे दर प्रतिकिलो ९५ ते १३० च्या दरम्यान होते. आता खोबर्‍याचे दर २०० ते २२० रुपये प्रतिकिलोवर जाऊन पोहोचले आहेत. उन्हाळ्यात मसाल्यासाठी खोबर्‍याची मागणी असते; परंतु दर दुपटीने वाढल्याने ग्राहकांचे अंदाजपत्रक कोलमडले आहे. खोबर्‍याबरोबरच खोबरेल तेलातही भाववाढ झाली आहे. दोन महिन्यांत वीस रुपयांनी दरवाढ झाली आहे. मात्र पॅराशूटसारख्या सर्वाधिक खपाच्या तेल कंपनीने आणखी भाववाढीचे संकेत दिले आहेत. ५०० एम.एल. पॅराशूट खोबरेल तेलाची बाटली १६६ रुपयांवरून १८० रुपये, तर २५० एम.एल. तेलाची बाटली ६९ वरून ८४ रुपयांवर जाऊन पोहोचणार आहे. पॅराशूटचे पाऊचही १८ रुपयांवरून २७ रुपयांवर जाऊन पोहोचणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. आरोग्यदायी खोबरेल तेलखोबरेल तेलाचा वापर केसांच्या पोषणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय त्वचेच्या संरक्षणासाठीही तेलाचा उपयोग केला जातो. खोबरेल तेल हा दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये महत्त्वाचा घटक असल्याने त्याचा वापर आवश्यकच मानला जातो. खोबरेल तेलाच्या दरात वाढ झाली असली, तरी त्याचा वापर टाळता येणे शक्य नाही; परंतु डोक्याला चपाचप तेल चोपणार्‍यांना मात्र भाववाढीमुळे हात आखडता घ्यावा लागणार असल्याचे दिसते.