शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
3
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
4
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
5
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
6
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
7
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
8
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
9
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
10
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
11
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
12
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
13
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
14
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
15
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
16
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
17
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
18
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
19
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
20
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ख्याल गायकीत रसिक तल्लीन !

By admin | Updated: January 11, 2015 00:29 IST

अखंड ख्याल संकीर्तन : पन्नास कलावंत आले एकत्र

नाशिक : कोणाचा राग तोडी, तर कोणाचा अहिर भैरव, कोणाची जयपूर घराण्याची अदाकारी, तर कोणाची ग्वाल्हेर घराण्याची पेशकश... एकाहून एक सरस अशा ख्याल गायकीची पर्वणी नाशिककरांना लाभली. निमित्त होते अखंड ख्याल संकीर्तनाचे. कुसुमाग्रज स्मारकात शनिवारी या महोत्सवाला प्रारंभ झाला. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. यानिमित्ताने शहरातील शास्त्रीय गायन-वादन क्षेत्रातील सुमारे पन्नास नवोदित व ज्येष्ठ कलावंत एकत्र आले आहेत. ज्येष्ठ गायक शशिकांत मुजुमदार व यशवंत खाडिलकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष किशोर पाठक, प्रमुख कार्यवाह लोकेश शेवडे, गायक मकरंद हिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी देवश्री नवघरे यांनी तोडी राग सादर केला. त्यानंतर जाई सराफ यांनी अहिर भैरव, प्रसाद दुसाने यांनी भैरव, शरद नवघरे यांनी शिवमत भैरव, श्रीराम तत्त्ववादी यांनी शुद्ध सारंग, देविका काशीकर यांनी जौनपुरी राग पेश केला. त्यांना आनंद अत्रे, सागर कुलकर्णी, कल्याणी दसककर, ईश्वरी दसककर, दिव्या रानडे, प्रसाद गोखले, कल्याणी दसककर यांनी अनुक्रमे संवादिनीची, तर सुजित काळे, जयेश कुलकर्णी, प्रमोद भडकमकर, दिगंबर सोनवणे, नितीन पवार, प्रमोद भडकमकर, गौरव तांबे यांनी तबल्याची साथ दिली. दुसऱ्या सत्रात वीणा गोखले, अश्विनी भार्गवे, सुनील देशपांडे, कल्याणी दसककर, रागेश्री वैरागकर, आनंद अत्रे यांनी गायन केले. त्यांना अनुक्रमे प्रसाद गोखले, कल्याणी दसककर, सागर कुलकर्णी, ईश्वरी दसककर, जगदेव वैरागकर, दिव्या रानडे, सुभाष दसककर यांनी संवादिनीची, तर गिरीश पांडे, सुजित काळे, दिगंबर सोनवणे, रसिक कुलकर्णी, नितीन वारे आदिंनी तबल्याची साथसंगत केली. आशिष रानडे यांनी सूत्रसंचालन केले.