पेठ : एकीकडे पावसाळा तोंडावर आला असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामात अडकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दुसरीकडे कोरोनाचा सामना करतच यंदाचा खरीप हंगाम पार पाडावा लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे, तर पेठ तालुक्यात जवळपास २६ हजार हेक्टर खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.पेठ तालुक्यात सर्वाधिक भात व नागली ही दोन प्रमुख पिके घेतली जातात. जवळपास २३०० मिमी पावसाची सरासरी असलेल्या तालुक्यात अजूनही बहुतांश शेतकरी पारंपरिक पिकांना महत्त्व देत असून, या दोन्ही पिकांची पेरणी व लावणी अशा दोन टप्प्यात विभागणी करण्यात येत असते. तालुका कृषी विभाकडून तयार करण्यात आलेल्या खरीप पीक पेरणी आराखड्यात यावर्षी २५ हजार ९०० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये भात व नागलीसह वरई, तूर, उडीद, कुळीद, भुईमूग, खुरासणी, सोयाबीन, मूग आदी पिकांचा समावेश आहे.१ जून रोजी मान्सून केरळात दाखल होण्याचे संकेत मिळाल्यानंतर शेतकºयांनी खरेदीची लगबग सुरू केली असून, सध्या कोरोना विषाणूची भीती असतानाही बाजारपेठात योग्य खबरदारी घेऊन शेतकरी खते, बी-बियाणे शेती अवजारे व आवश्यक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडत आहे. पेठ शहरातील कृषी सेवा केंद्रामध्ये भाताच्या विविध जातींचे बियाणे उपलब्ध असून, नोंदणी करणाºया शेतकरी गटांना थेट बांधावर बियाणे पुरवठा करण्याची व्यवस्था कृषी विभागाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी शेतकºयांची लगबग दिसून येत आहे.पेठ तालुका हा डोंगरदºयात वसलेला असल्याने येथे जास्त व कमी पावसाची अशा दोन्ही प्रकारची पिके घेतली जातात. डोंगर उतारावर नागली व वरई घेतली जाते तर जास्त पाणी असलेल्या खाचरात भाताची लावणी करण्यात येत असते. खरीप हंगामाबाबत तालुका कृषी कार्यालयाकडून मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व यंत्रणेच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत असून, सद्या शेतकरी पेरणीपूर्व मशागत करत आहेत.- अरविंद पगारे, तालुका कृषी अधिकारी, पेठ
२६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 00:06 IST
एकीकडे पावसाळा तोंडावर आला असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामात अडकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दुसरीकडे कोरोनाचा सामना करतच यंदाचा खरीप हंगाम पार पाडावा लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे, तर पेठ तालुक्यात जवळपास २६ हजार हेक्टर खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.
२६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी
ठळक मुद्देपेठ : शेतकऱ्यांना बांधावर मिळणार खते-बियाणे