शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खापराळे जिल्हा परिषद शाळेची दूरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 18:21 IST

सिन्नर तालुक्यातील खापराळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दूरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

सिन्नर : तालुक्यातील खापराळे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दूरवस्था झाल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.इयत्ता पहिली ते चौथीच्या चार वर्गासाठी सध्या एकच वर्गखोली किमान सुस्थितीत आहे. हे चार वर्ग मिळून त्यांची पटसंख्या इतकी आहे. की हे चारही वर्ग एकाच वर्गखोलीत आळीपाळीने भरतात. नुकतीच तिचीही दुरूस्ती करण्यात आली आहे. परंतु निकृष्ट कामामुळे चिमण्यांनी छताकडे भिंती कोरून घरटे केल्याने तेथे साप येवून बसतात. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे.तालुक्यातील खापराळे हे सिन्नरच्या पश्चिम भागात डोंगरावर वसलेले छोटेसे गाव असून, येथे अंगणवाडी आणि इयत्ता पहिली ते चौथी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेसाठी २००५-०६ या आर्थिक वर्षात एक वर्गखोलीचे लाखो रूपये खर्च करून आरसीसी छत बांधकाम केले. अवघ्या अकरा वर्षांतच संबंधित वर्गखाली धोकादायक बनली आहे. पावसाळ्यात वर्गखोलीत पाणीच पाणी होते. स्लॅब पाझरून त्यातील लोखंडी सळ्या गंजल्या आहेत. त्यामुळे बांधकामाचा खर्च पाण्यात गेला आहे. दारे, खिडक्या गंजून त्याचे पापडे पडत असल्याने ते कधीही तुटून पडतील सांगता येत नाही. पावसाळ्यात भिंतीना पाझर येतो. तो पावसाळ्यानंतरही किमान दोन महिने टिकून राहतो. त्यामुळे भिंतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. एवढी दुरवस्था असूनही या शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता मात्र चांगली आहे.संबंधित मुख्याध्यापकांनी वर्गखोली निर्लेखित करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र त्यानूसार वर्गखोल्यांचे आयुर्मान पूर्ण न झाल्याने फक्त दुरूस्ती होवू शकते. या पूर्वी अनेकदा प्रस्ताव देवूनही दुरूस्तीसुध्दा होवू शकली नाही. परिणामी या पावसाळ्यातही आणि पुढेही किती दिवस चार इयत्ता एकाच वर्गात आणि वर्गाबाहेर शिक्षणाचे धडे घ्यावे लागतील ते सांगता येणार नाही.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदSchoolशाळा