शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात मातब्बरांचे गड खालसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:27 IST

ओझर : निफाड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत मातब्बरांचे गड खालसा झाले, तर अनेक ठिकाणी गाव पुढाऱ्यांना सत्ता कायम राखता आली.

ठळक मुद्देसत्तांतर : लासलगावी होळकर-पाटलांची सत्ता कायम

ओझर : निफाड तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक ठिकाणी झालेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत मातब्बरांचे गड खालसा झाले, तर अनेक ठिकाणी गाव पुढाऱ्यांना सत्ता कायम राखता आली.लासलगावात अनेक वर्षांपासून कट्टर राजकीय विरोधक असलेले जयदत्त होळकर आणि नानासाहेब पाटील यांच्या पॅनलने दहा जागांवर बाजी मारली, तर जिल्हा परिषद सदस्य डी.के. जगताप कल्याणराव पाटील यांच्या गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले. शिवडीत जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांना जोरदार धक्का देत, रासाका बचाव समितीचे नामदेव शिंदे यांनी सहा जागा काबीज केल्या. नैताळेत जेसीबीच्या साहाय्याने गुलाल उधळण्याचे स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने साकार केले असून, तेथे परिवर्तन झाले आहे. कोठुरेत सत्तेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र डोखळेना मतदारांनी कौल दिला असला, तरी त्यांच्या पत्नीचा मात्र पराभव झाला. तेथे आशिष मोगल यांचा गट सत्तेत होता. वनसगाव येथे उन्मेष डुंबरें पायउतार करत, राहुल डुंबरे यांच्या संघटित पॅनलने बाजी मारली. सर्वाधिक चर्चेत असलेल्या करंजगाव येथे खंडू बोडके पाटील यांना सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे.

दात्याणे येथे भूषण धनवटे यांच्या गटाचा पराभव होऊन सुनील पवार, केदु गवळी यांच्या पॅनलने बाजी मारली आहे. नांदूरमध्यमेश्वर येथे हरिश्चंद्र भवर यांच्या गटाला धोबीपछाड देत, शरद शिंदे गटाने बाजी मारली आहे. शिरवाडे वणीत परिवर्तन होऊन अशोक निफाडे यांच्या गटाला सहा जागा तर शरद काळे यांना ५ जागांवर समाधान मानावे लागले. पिंपरीत मनसेने मुसंडी मारली आहे.          इतर ग्रामपालिकेत उगाव मध्ये पानगव्हाणे, म्हाळसकोरेत संजय शिंदे, आहेरगावात काशीनाथ मोरे, कारसुळ मध्ये देवेंद्र काजळे सपत्नीक, तर उंबरखेडमध्ये सेनेचे भाऊ घुमरे यांचा पराभव करण्यासाठी एकत्र आलेल्या यंत्रणेला अपयश आले असून, तेथे त्यांनी सत्ता कायम राखली आहे.जेथे परिवर्तन झाले तेथे प्रस्थापितांना विरोध दिसून आला. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला कौल मिळाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक