शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:साठीची खादी स्वत:च्या हातांनी...

By admin | Updated: October 1, 2015 23:26 IST

कताई मंडळ : शहरातील ४० गांधीवादी एकत्र येऊन राबवताहेत उपक्रम

( सुदीप गुजराथी)  नाशिक - ‘वस्त्र नव्हे विचार’ अशा शब्दांत महात्मा गांधीजींनी ज्या खादीचे वर्णन केले, त्या खादीचे कापड नुसते स्वत: वापरायचेच नाही, तर ते स्वत:च्या हाताने तयार करण्याचे काम शहरातील ४० गांधीवादी करीत आहेत. रोज सुमारे एक तास अंबर चरख्यावर सूतकताई करीत ही माणसे पर्यावरण रक्षणासह स्वावलंबनाचा मंत्रही जोपासत आहेत.महात्मा गांधींनी स्वातंत्र्यपूर्व काळात गरीब भारतीयांचा स्वाभिमान जागा करीत त्यांना चरख्यावर सूतकताईचा कर्मयोग सांगितला. यामुळे परदेशी कापडाची मागणी तर घटलीच; शिवाय देशातील हजारो गरिबांच्या हातांना काम मिळाले, स्वावलंबनाचा मंत्र मिळाला. गांधीजींनी आयुष्यभर खादी वापरली. त्यांचा हा विचार देशातील हजारो गांधीवादी आजही अंमलात आणतात. नाशिकमध्ये सन २००८ मध्ये येथील सर्वोदयी कार्यकर्त्यांनी ‘जीवन उत्सव’ या पर्यावरणपूरक जीवनशैलीविषयीच्या आगळ्या उपक्रमाला सुरुवात केली. त्यावेळी अनेक कार्यकर्ते एकत्र येऊन सूतकताईविषयी चर्चा झाली. त्यातूनच ज्येष्ठ कार्यकर्त्या वासंती सोर यांना ‘कताई मंडळ’ स्थापन करण्याची कल्पना सुचली. सोर या पूर्वीपासून अंबर चरखा कताईचे प्रशिक्षण देतच होत्या. अशा प्रशिक्षित मंडळींनी स्वत: चरखा विकत घेऊन घरात कापसाच्या पेळूपासून रोज किमान एक तास सूतकताई करावी, त्यातून तयार झालेले सूत वर्ध्याच्या ग्रामसेवा मंडळाकडे देऊन त्या बदल्यात खादीचे कापड आणावे आणि त्यातून स्वत:साठी वस्त्रे शिवावीत, अशी मंडळाची कल्पना होती. त्यानुसार शहरातील चाळीस गांधीवादी रोज सूतकताई करतात. त्यांत वासंती सोर यांच्यासह मुकुंद दीक्षित, दिलीप धुळेकर, अजित टक्के, गौतम भटेवरा आदिंचा समावेश आहे. दर महिन्याला मंडळाचा एक सदस्य सर्वांनी तयार केलेल्या सुताच्या गुंड्या वर्ध्याला घेऊन जातो आणि तेथून खादीचे कापड व पेळू घेऊन येतो. हे सदस्य या कापडापासून तयार केलेलेच सदरे, पायजमे, साड्या, रुमाल, बेडशिटस् वापरतात.