शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मणगावी सत्तेची चावी अपक्षांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:30 IST

ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून, दोन्ही पॅनलकडे सात सात उमेदवार असून, सत्तेची चावी तिन्ही अपक्षांच्या हाती आहे. त्यात लक्ष वेधून घेणाऱ्या लढतीमध्ये माजी सदस्यांपैकी माजी सरपंच सरला राघो अहिरे व माजी सरपंच सुभाष पंढरीनाथ अहिरे यांना पराभव पत्करावा लागला. माजी सदस्यांमध्ये किरण मधुकर अहिरे पुन्हा विजयी झाले आहेत.

ठळक मुद्देनम्रता पॅनलला ७ जागा : परिवर्तन पॅनलला ६ जागा

ब्राह्मणगाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल धक्कादायक लागला असून, दोन्ही पॅनलकडे सात सात उमेदवार असून, सत्तेची चावी तिन्ही अपक्षांच्या हाती आहे. त्यात लक्ष वेधून घेणाऱ्या लढतीमध्ये माजी सदस्यांपैकी माजी सरपंच सरला राघो अहिरे व माजी सरपंच सुभाष पंढरीनाथ अहिरे यांना पराभव पत्करावा लागला. माजी सदस्यांमध्ये किरण मधुकर अहिरे पुन्हा विजयी झाले आहेत.

परिवर्तन पॅनलला ६ जागा, नम्रता पॅनल ७ जागा व एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. आता सरपंच पदाचे आरक्षण कोणते निघते, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आरक्षणमध्ये अनुसूचित जमाती निघाल्यास दोन्ही पॅनलकडे अनुसूचित जमातीची स्त्री, पुरुष उमेदवार आहेत. मात्र, आरक्षणामध्ये अनुसूचित जातीसाठी निघाल्यास अनुसूचित जाती स्त्री, पुरुष, उमेदवार हे फक्त परिवर्तन पॅनलकडे आहेत, हे विशेष आहे.नम्रता पॅनलचे विजयी उमेदवार रत्नाकर सुदाम अहिरे, नर्मदा रामदास सोनवणे, वंदना माधव पगार, कैलास शिवामन नवरे, अरुण त्रांबक अहिरे, मयुरी सुमेरासिंह परदेशी, प्रतिभा कैलास अहिरे, तसेच परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार शोभा सुभाष अहिरे, रत्ना समाधान माळी, किरण मधुकर अहिरे, रेखा संदीप अहिरे, बापू तुळशीराम खरे, ज्योती विश्वास खरे, तर अपक्ष उमेदवार केदा बापू ढेपले विजयी झाले.निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन पॅनलचे विनोद सीताराम अहिरे हे बिनविरोध निवडले आहेत. सुनंदा यशवंत माळी, जनार्दन नामदेव सोनवणे, हे दोन्ही उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत प्रभाग ५ मध्ये किरण मधुकर अहिरे व विनोद सीताराम अहिरे हे दोन उमेदवार मागील सदस्यांपैकी उमेदवार असून, अन्य १५ उमेदवार हे नवखे आहेत.मविप्र उपसभापतींच्या पत्नी पराभूतनिवडणुकीत तीन कुटुंबातील दोन दोन उमेदवार उभे होते. त्यात प्रभाग पाचमध्ये मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे उपसभापती राघो अहिरे यांच्या पत्नी सरला राघो अहिरे यांचा पराभव झाला, तर त्यांच्याच घरातील त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे संचालक यशवंत बापू अहिरे यांच्या सूनबाई रेखा संदीप अहिरे या विजयी झाल्या. प्रभाग पाचमध्ये कैलास ऊखा अहिरे पराभूत झाले, तर त्यांच्या पत्नी प्रतिभा कैलास अहिरे प्रभाग सहामध्ये विजयी झाल्या. प्रभाग पाचमध्ये किरण मधुकर अहिरे हे विजयी झाले, तर प्रभाग सहामध्ये त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या भावजाई रत्ना सुनील अहिरे या पराभूत झाल्या. या लढतींकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक