ब्राह्मणगाव : येथील स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी केशव मानाजी अहिरे, तर उपाध्यक्षपदी अनिल भिका बधान यांची बिनविरोध निवड करण्यात आली.पतसंस्थेची नुकतीच पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली होती. शनिवारी सकाळी संस्थेच्या कार्यालयात निवडणूक अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी डी. पी. अहिरे व चंद्रकांत अहिरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडली. प्रारंभी चेअरमन केशव मानाजी अहिरे यांची चेअरमनपदी निवड झाली. त्यानंतर अनिल भिका बधान यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.याप्रसंगी संचालक संस्थापक अशोक शिरोडे, अविनाश जोशी, कैलाश अहिरे, कांतिलाल लोणारी, दत्तात्रेय खरे, भरत बिरारी, ज्ञानेश्वर गोरे उपस्थित होते. आभार सचिव संजय जाधव यांनी मानले.(वार्ताहर)
स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या अध्यक्षपदी केशव अहिरे
By admin | Updated: October 13, 2016 22:58 IST