शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

विकासनिधीतील कामे रखडणार

By admin | Updated: October 18, 2016 02:16 IST

आयोगाच्या निर्णयाचा फटका : ३५५ कामांना लागणार ब्रेक

नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून लोकप्रतिनिधींना विविध कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नसल्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढले आहेत. त्यानुसार, नाशिक महापालिकेची मुदत १५ मार्च २०१७ रोजी संपुष्टात येणार असल्याने नगरसेवकांना स्वेच्छा निधीचा वापर करण्यासाठी १४ डिसेंबर २०१६ पर्यंत डेडलाइन आहे. महापालिकेत नगरसेवकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या स्वेच्छानिधीबरोबरच ५० लाख रुपयांचाही विकासनिधी अंदाजपत्रकात मंजूर करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ३४ कोटी रुपयांच्या ३५५ कामांचे प्रस्ताव प्राकलने तयार करण्यासाठी त्या-त्या विभागाकडे पाठविण्यात आली असली तरी त्यांचे कार्यादेश निघून प्रत्यक्ष काम सुरू होण्यास सुमारे पाच ते सहा महिन्यांचा अवधी जाणार आहे. त्यामुळे विकासनिधीतील कामे रखडण्याचीच शक्यता आहे. निवडणुकांपूर्वी लोक -प्रतिनिधींकडून मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी स्वेच्छा निधीचा वापर करत असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले. त्यामुळे निवडणुका मुक्त, निर्भय वातावरणात पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आयोगाने आता स्वेच्छा निधीच्या वापरावर बंधने घालण्याचा निर्णय घेतला असून, तसा आदेश दि. ५ आॅक्टोबर रोजी निर्गमित केला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार, कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या तीन महिने आधीपासून किंवा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून, यापैकी जे अगोदर घडेल त्या दिनांकापासून कोणत्याही लोकप्रतिनिधींना त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रातील कामांवर स्वेच्छा निधीतून खर्च करता येणार नाही. याशिवाय, कोणत्याही लोकप्रतिनिधींनी स्वेच्छा निधीतून कोणत्याही प्रकारचे आश्वासन देऊ नये किंवा मंजुरीसाठीही नव्याने प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांकडे देऊ नयेत, असे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत. १५ डिसेंबरपूर्वी एखादा प्रस्ताव मंजूर झाला असेल, पण प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली नसेल तर कार्यारंभ आदेशही देऊ नये व कामास सुरुवातही करूनये, असेही म्हटले आहे. मात्र जर प्रत्यक्ष कामाची सुरुवात होऊन गेली असेल तर तेच काम सुरूठेवण्याचे निर्देश आहेत. मात्र, निर्बंध न पाळल्यास सदर कामास स्थगिती देण्याचे व संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईचे आदेशही आयोगाने दिले आहेत. नाशिक महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होऊ घातली असून, १५ मार्च २०१७ पर्यंत नवीन महापौर नियुक्ती होणे आवश्यक आहे. १५ मार्च २०१७ रोजी नाशिक महापालिकेतील विद्यमान नगरसेवकांची मुदत संपुष्टात येणार असल्याने त्यापूर्वी तीन महिने अगोदर म्हणजे १४ डिसेंबरपासून नगरसेवकांना त्यांच्या विकासनिधीतून खर्च करता येणार नाही. महापालिकेच्या अंदाजपत्रकात प्रत्येक नगरसेवकासाठी ५० लाख रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. आतापावेतो नगरसेवकांनी ३५५ कामांचे प्रस्ताव दिले असून, त्याची रक्कम ३४ कोटी ५३ लाखांपर्यंत जाते. मात्र, सदर प्रस्तावांचा प्राकलन तयार करण्यापासून ते महासभा, स्थायी समितीची मंजुरी, निविदाप्रक्रिया असा बराच मोठा काळ जाणार असल्याने चालू पंचवार्षिक काळात सदर कामे प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता जवळपास नाहीच. त्यामुळे आयोगाच्या निर्णयाचा फटका नगरसेवकनिधीला बसणार असून, कामे रखडणार आहेत. (प्रतिनिधी)