शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कावळे यास दोन दिवसांची कोठडी

By admin | Updated: July 16, 2016 00:32 IST

लाच प्रकरण : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता

नाशिक : महापालिकेतील बांधकामांच्या ठेक्यापोटी भरलेली मुदतठेव परत करण्यासाठी ठेकेदाराकडून ३३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून २० हजार रुपये स्वीकारताना सापळा रचून अटक करण्यात आलेले वरिष्ठ लिपिक संशयित शेखर निवृत्ती कावळे (५४) यांस एसीबी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एऩ के. ब्रह्मे यांनी शुक्रवारी (दि़ १५) दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही यामध्ये सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील कल्पक निंबाळकर यांनी न्यायालयात केला़महापालिकेच्या बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक असलेले व सद्यस्थितीत नाशिकरोडच्या विभागीय कार्यालयातील घरपट्टी विभागात बदली झालेले संशयित शेखर कावळे यांना गुरुवारी (दि़ १४) चार वाजेच्या सुमारास ठेकेदाराकडून २० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर अटक करण्यात आली होती़ सरकारी वकील निंबाळकर यांनी न्यायालयास सांगितले की, पंचनाम्यामध्ये साहेबांना दोन टक्के प्रमाणे पैसे द्यावे लागतील, असे म्हटले असून या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. तसेच सापळ्यानंतर तपासी यंत्रणेने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रिचेबल होते़ वरिष्ठ लिपिक कावळेंची ५ मे २०१६ रोजी नाशिकरोडला बदली करण्यात आली त्याठिकाणी ते हजरही झाले; मात्र तरीही ते बांधकाम विभागातच काम कसे काय करीत होते याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे तपास करणे आवश्यक आहे़ मनपाच्या बांधकाम विभागात ठेकेदारांच्या बिलांच्या व्यवहारामध्ये कावळेंची भूमिका महत्त्वाची असून त्याचा योग्य तपास होणे गरजेचे आहे़ याबरोबरच आवाजाचे नमुने, पंचनामा, कागदावर दिलेले पैशांचे विवरण व मागणी केल्यामुळे हस्ताक्षर नमुना तसेच कावळेंच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली. (प्रतिनिधी)