शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

कुष्ठरोगींना पालिकेमार्फत मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:31 IST

शहरातील सुमारे ३३८ कुष्ठरोगींना महापालिकेच्या वतीने दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाणार असून, वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कुष्ठपीडितांना मोठा आधार लाभणार आहे.

नाशिक : शहरातील सुमारे ३३८ कुष्ठरोगींना महापालिकेच्या वतीने दरमहा १५०० रुपये मानधन दिले जाणार असून, वैद्यकीय विभागाने सादर केलेल्या प्रस्तावाला आयुक्तांनी मान्यता दिली आहे. महापालिकेच्या या निर्णयामुळे कुष्ठपीडितांना मोठा आधार लाभणार आहे. सदर प्रस्तावावर आता लेखा विभागामार्फत अंतिम कार्यवाही सुरू आहे. कुष्ठरोगींना समाजात वावरताना मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध सेवाभावी संस्थांमार्फत उपक्रम राबविले जात असतात परंतु, कुष्ठरोगींना जगण्यासाठी आर्थिक हातभार लावता येईल काय, याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन होता. मागील पंचवार्षिक काळात तत्कालीन नगरसेवक रूपाली गावंड यांनी कुष्ठरोगींना दरमहा १००० रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव महासभेसह स्थायी समितीवर ठेवला होता. फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुका झाल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक जगदीश पाटील आणि हेमंत शेट्टी यांनी एप्रिलच्या महासभेत कुष्ठरोगींना दरमहा १५०० रुपये मानधन त्यांच्या बॅँक खात्यात जमा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाला महासभेसह स्थायीने मंजुरी दिल्यानंतर आयुक्तांनीही त्यास हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे, शहरातील ३३८ कुष्ठपीडितांना आर्थिक साहाय्य लाभून त्यांना जगण्याचा आधार मिळणार आहे. वैद्यकीय विभागाने सदरचा प्रस्ताव लेखा विभागाकडे पाठविला असून, तो कार्यवाहीत आहे. या निर्णयामुळे महापालिकेला प्रतिवर्षी अंदाजपत्रकात सुमारे ६१ लाख रुपयांची तरतूद करावी लागणार आहे.१५१ संशयित रुग्ण आढळलेमहापालिकेने सप्टेंबर-आॅक्टोबर या कालावधीत शहरात कुष्ठरोग शोध अभियान राबविले होते. कुष्ठरोगींचे प्रमाण जास्त असलेल्या भागात सदर अभियान राबविण्यात आले होते. महापालिकेने शोध अभियानात दोन लाख २३ हजार नागरिकांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यात १५१ संशयित रुग्ण आढळून आले होते. सदर संशयितांची तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत पुन्हा तपासणी केली असता शहरातील विविध भागांत नवीन १४ रुग्णांना कुष्ठरोग झाल्याचे निष्पन्न झाले. मात्र, कुष्ठपीडितांची संख्या त्याहून अधिक असल्याचा दावा माजी नगरसेवक भगवान भोगे यांनी केला होता. त्यामुळे, लाभार्थींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.